देशासह राज्यात ATS आणि NIAच्या धाडी! मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादमध्ये काय घडतंय, वाचा 10 अपडेट्स

राज्यात विविध शहरांमधून आतापर्यंत 20 एटीएस आणि एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतलं आहे. अजूनही अनेक ठिकाणी ही छापेमारी सुरु आहे.

देशासह राज्यात ATS आणि NIAच्या धाडी! मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादमध्ये काय घडतंय, वाचा 10 अपडेट्स
पुण्यातील पीएफआयच्या कार्यालयावर धाड
मंजिरी धर्माधिकारी

|

Sep 22, 2022 | 1:51 PM

मुंबईः देशभरातील 11  राज्यांत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular front of India) अर्थात PFI या संघटनेच्या कार्यलायांवर आज धाडी टाकण्यात आल्या आहेत. दिल्लीत PFI चे अध्यक्ष परवेज अहमद याला एनआयएकडून अटक झाली आहे. PFI च्या तीन एजंटला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आलंय. एटीएस (ATS) आणि एआयएच्या (NIA) पथकांनी ही छापेमारी केली आहे. महाराष्ट्रातही औरंगाबाद, नाशिक, पुणे, मुंबई, नवी मुंबई, भिवंडीतही हे धाडसत्र सुरु आहे. राज्यात विविध शहरांमधून आतापर्यंत 20 संशयितांना एटीएस पथकाने ताब्यात घेतलं आहे. दिल्लीत PFI चे अध्यक्ष परवेज अहमद याला एनआयएकडून अटक झाली आहे. PFI च्या तीन एजंटला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आलंय. PFI ही कट्टरतावादी संघटना आहे. दहशतवादी कारवायांसाठी या संघटनेच्या माध्यमातून फंडिंग केलं जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याच तपासासाठी एटीएस आणि एआएकडून देशभरात हे धाडसत्र सुरु आहे.

राज्यातील धाडसत्रांचे अपडेट्स-

  1. औरंगाबादमध्ये पाच ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित 4 जणांना ताब्यात घेतलं आहे. एका झोमॅटो कंपनीत काम करणारा तरुण असून , किराडपुरा, नॅशनल कॉलनी, हाडको परिसरातून प्रत्येकी एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलंय.
  2. नांदेडमध्ये पीएफआयच्या एका पदाधिकाऱ्याला एटीसने ताब्यात घेतलय .. मेराज अन्सारी याला मध्यरात्री त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले . मेराज अन्सारी हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा राज्य मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहे.
  3. बीडमध्ये जुना बाजार परिसरात PFI चे कार्यालय आहे. या ठिकाणी छापेमारी झाली नाही. मात्र एका सदस्याला एटीएसच्या टीमने ताब्यात घेतलं आहे. वसीम शेख या PFI च्या सदस्याला ताब्यात घेतलं आहे.
  4. नाशिक जिल्ह्यात pfi संघटनेशी संबंधित मालेगावमधून एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. मौलाना सैफूर रहमान असं या संशयिताचं नाव आहे. हुडको परिसरातून एनआयए आणि एटीएसच्या टीमने पहाटे संशयिताला ताब्यात घेतलं आहे. तो संघटनेचा सक्रीय कार्यकर्ता होता.
  5. मालेगावमधील संशयिताच्या घरातून अनेक संशयास्पद कागदपत्र, सीडी, पेनड्राइव्ह देखील ताब्यात घेण्यात आलंय.
  6. भिवंडीतूनही एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय.
  7. जळगावात अकोला एटीस ने आज कारवाई केली आहे. आज सकाळी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मेहरून परिसर, जळगाव येथून तीन जणांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर दोन जणांना सोडून देण्यात आले आहे. तर तर एकाला अटक करण्यात आली आहे.
  8.  परभणीतही कारवाई करण्यात आली . या कारवाईमध्ये संघटनेच्या तीन पदाधिकाऱ्यांना एन आय ए आणि एटीएसने ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
  9. कोल्हापुरात पीएफआय चा पदाधिकारी अब्दुल मौला याला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
  10. पुण्याच्या कोंडवा परिसरात पीएफआयच्या कार्यालयावर छापेमारी झाली. आतापर्यंत दोघांना ताब्यात घेण्यात आलंयपहा कुठे कुठे काय काय घडलं?


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें