AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाल दिव्याच्या वाहनातील अन् तहसीलदारांच्या खुर्चीवरील फोटो तरुणींना पाठवले, लग्नासाठी फसवणुकीचे रॅकेट, युवतींकडून घेतले लाखो रुपये

Crime News: आरोपी निनाद कापुरे याने मेट्रोमोनिअल साईटवर प्रीमियम अकाउंट घेतले होते. त्यावरुन तो तरुणींची फसवणूक करत होता. खोटी प्रोफाइल टाकून विवाहासाठी हाय प्रोफाईल महिलांशी संपर्क करत होता.

लाल दिव्याच्या वाहनातील अन् तहसीलदारांच्या खुर्चीवरील फोटो तरुणींना पाठवले, लग्नासाठी फसवणुकीचे रॅकेट, युवतींकडून घेतले लाखो रुपये
| Updated on: Jul 17, 2025 | 9:42 AM
Share

Crime News: लग्नासाठी फसवणूक करण्याचे अनेक प्रकार घडत असतात. परंतु शासकीय नोकरीत अधिकारी आहे, आपल्याकडे लाल दिव्याची गाडी आहे, असे फोटो पाठवून मुलींची फसवणूक करण्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यातून उघड झाला आहे. धरणगाव येथील निनाद विनोद कापुरे या तरुणाने लग्नासाठी सहा तरुणींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आले आहे. या प्रकरणात तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन त्याला अटकही झाली आहे.

तरुणींकडून घेतले लाखो रुपये

नाशिक व फलटणच्या तरुणींनी जळगावात पोलिस अधीक्षकांना भेटून लेखी तक्रार केली. जळगावच्या धरणगाव येथील निनाद कापुरे या तरुणाने आपण नायब तहसीलदार आहोत, क्लास वन अधिकारी आहोत, असे सांगून लग्नाच्या नावाने अनेक तरुणींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. निनाद कापुरे याने सरकारी लाल दिव्याच्या वाहनातील तसेच तहसीलदारांच्या खुर्चीवर बसलेले फोटो तरुणींना पाठवले. तसेच दोन तरुणींकडून एकूण १५ लाख उकळून फसवणूक केल्याचे देखील समोर आले आहे. हे सर्व फोटो व पैशाचे पुरावे जळगावात पोलिस अधीक्षकांकडे सादर करण्यात आले आहेत.

सहा तरुणींची केली फसवणूक

निनाद कपुरे याला फलटणच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली आहे. नाशिकच्या गुन्ह्यात अटक झालेली नाही. त्यामुळे त्याला अटक व्हावी, उकळलेली रक्कम परत मिळावी व भविष्यात आणखी तरुणींची फसवणूक होऊ नये यासाठी पोलिस अधीक्षकांना भेटून तरुणीने तक्रार केली आहे. आतापर्यंत निनाद याने अशाच प्रकारे सहा तरुणींना फसवले आहे, अशी माहिती समोर आली आहे.

आरोपी निनाद कापुरे याने मेट्रोमोनिअल साईटवर प्रीमियम अकाउंट घेतले होते. त्यावरुन तो तरुणींची फसवणूक करत होता. खोटी प्रोफाइल टाकून विवाहासाठी हाय प्रोफाईल महिलांशी संपर्क करत होता. हा प्रकार उघड झाल्यानंतर निनाद कापुरे याच्यावर फलटण व नाशिकमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या चौकशीत निनादने नेमकी किती मुलींची फसवणूक केली, हे समोर येण्याची शक्यता आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.