AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुप्पट परताव्याच्या आमिषाने 6 लाखांचा गंडा; ट्रेडिंग कंपनीच्या संचालकांवर नाशिकमध्ये गुन्हा

ट्रेडिंग कंपनीत पैसे गुंतवल्यास दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून 6 लाख रुपये हडपल्याप्रकरणी नाशिकमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुप्पट परताव्याच्या आमिषाने 6 लाखांचा गंडा; ट्रेडिंग कंपनीच्या संचालकांवर नाशिकमध्ये गुन्हा
crime
| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 11:50 AM
Share

नाशिकः ट्रेडिंग कंपनीत पैसे गुंतवल्यास दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून 6 लाख रुपये हडपल्याप्रकरणी नाशिकमध्ये आर. डी. ट्रेडिंग सोल्युशन कंपनीचा संचालक रवींद्र दराडे, मनीषा दराडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात ललितास सोनवणे यांनी तक्रार दिलीय. त्यानुसार दराडे दाम्पत्याने सोनवणे यांना आर. डी. ट्रेडिंग सोल्युशन कंपनीत सहा लाखांची गुंतवणूक करायला लावली. त्यातून दहा महिन्यांमध्ये दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवले. मात्र, दहा महिने झाल्यानंतर दुप्पट परतावा तर सोडाच, पण गुंतवणूक केलेले पैसेही वापस मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, दुसऱ्या घटनेत बँकेतून दोन लाखांची काढलेली रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नाशिकमधील शालिमार भागात घडली आहे. रेहाना रफिक शेख (वय 55, रा. शिवाजीरोड, शालिमार) या आपल्या पतीसह बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पैसे काढण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी जवळपास दोन लाखांची रक्कम बँकेतून काढली. पैसे आपल्याजवळच्या पिशवीत ठेवले. दोघेही बँकेतून बाहेर पडताच मोटारसायकलवर आलेले चोरटे रेहाना यांच्या हातातील पैशाची पिशवी हिसकावून पसार झाले. शेख दाम्पत्याने चोर, चोर अशी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत चोरटे बेपत्ता झाले होते. याप्रकरणी रेहाना शेख यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एटीएम कार्ड बदलून गंडा एटीएम कार्डची अदलाबदल करून ज्येष्ठांना गंडा; नाशिक पोलिसांचा हरियाणाच्या भामट्यांना धुळ्यात इंगा नाशिक पोलिसांनी धुळ्यात जावून हरियाणाच्या भामट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. शंकर आगलावे (वय 66) यांनी या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आगलावे हे 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास नाशिकरोड येथील दुर्गा गार्डनजवळील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. तेव्हा तिथे दोन भामटे आले. त्यांनी आगलावे यांच्या एटीएमचा पिन नंबर त्यांच्या अपरोक्ष चोरून पाहिला. त्यानंतर त्यांना बोलण्यात गुंगवून ठेवत त्यांच्या एटीएम कार्डचीही अदलाबदल केली. त्यातून जवळपास 32000 हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी आगलावे यांच्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात 182/2021 भादवि 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी धुळ्यात जावून पोलिसांनी विजयुकमार पालाराम राजपूत (वय 35, रा. प्रशांत कॉलनी, हसी रोड, बरवाला, जि. हिसार, हरियाणा) आणि सुनीलकुमार धुपसिंग राजपूत (वय 32, रा. प्रशांत कॉलनी, हसी रोड, बरवाला, जि. हिसार, हरियाणा) यांना बेड्या ठोकल्या आहेत. (Fraud of Rs 6 lakh by temptation to double money in 10 months, crime against directors of trading company in Nashik)

इतर बातम्याः

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये सत्ताधारी भाजपने 234 कोटींच्या रस्ते कामाचा नारळ फोडला!

22 हजार कोटींच्या विमान प्रकल्पासाठी भुजबळांच्या पायघड्या; नाशिकमध्ये येण्याचे टाटांना आवतन!

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.