धावत्या एक्सप्रेसमध्ये झोपलेल्या रेल्वे प्रवाशांच्या पर्स, बॅग पळवायचे, पोलिसांनी ‘असा’ काढला टोळीचा माग

रात्रीच्या वेळी प्रवासी झोपेत असल्याचा फायदा घेत महिलांच्या पर्स, दागिने चोरुन ते पसार व्हायचे. चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले.

धावत्या एक्सप्रेसमध्ये झोपलेल्या रेल्वे प्रवाशांच्या पर्स, बॅग पळवायचे, पोलिसांनी 'असा' काढला टोळीचा माग
धावत्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंदImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 4:39 PM

सुनील जाधव, कल्याण : धावत्या एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची पर्स चोरी करणाऱ्या टोळीस लोहमार्ग पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्हीच्या मदतीने बेड्या ठोकल्या आहेत. रवी दशरथ गायकवाड, गणेश सुरेश राठोड ऊर्फ गोल्या, प्रकाश आश्रुबा नागरगोजे, तानाजी शिवाजी शिंदे अशी या आरोपींची नावं आहेत. या आरोपींकडून आठ गुन्ह्यातील एकूण 9 लाख 41 हजार 998 रुपये किंमतीचे सोने-चांदीचा ऐवज आणि 5 मोबाईल फोन दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चोरीचे वाढते प्रमाण पाहता पोलीस आयुक्तांचे कारवाईचे आदेश

नजीकच्या काळामध्ये अहमदाबाद वसई-पुणे अप डाऊन मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या पर्स दांगिन्यासह चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाणे वाढले होते. लोहमार्ग पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, लोहमार्ग मध्य परिमंडळ पोलीस उप आयुक्त मनोज पाटील यांनी गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांन गुन्हेगारांना अटक करुन मालमत्ता हस्तगत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-3, कल्याण लोहमार्ग, मुंबई येथील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी स्टेशन परिसरात दाखल असलेल्या गुन्ह्यांचे समातंर तपासणी करत सीसीटीव्ही फुटेज तपासले.

आरोपींकडून साडे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

याच दरम्यान एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार इसम हे रेल्वे प्लॅटफॉर्मवर संशयितरित्या वावरत असताना दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे तपास करून रवी दशरथ गायकवाड, गणेश सुरेश राठोड ऊर्फ गोल्या, प्रकाश आश्रुबा नागरगोजे, तानाजी शिवाजी शिंदे या चार आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडे विचारपूस केली असता त्यांनी आठ गुन्ह्यांची कबुली देत 9 लाख 41 हजार 998 रुपये किंमतीचा सोने-चांदीचा ऐवज आणि 5 मोबाईल फोन दीड लाखाचा मुद्देमाल पोलिसांना दिला.

हे सुद्धा वाचा

पोलिसांच्या माहितीनुसार हे चारही आरोपी रेकॉर्डवरचे असून, या चौघांपैकी तीन आरोपी पुण्यात राहत असून एक आरोपी छत्रपती संभाजी नगर परिसरात राहणार आहे. हे चारही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध नांदेड, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, भुसावळ या ठिकाणी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

Non Stop LIVE Update
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.