अनेकदा शरीरसंबंध ठेवल्यानंतर प्रेयसीने विचारला प्रश्न.., प्रियकराचं उत्तर ऐकून थेट गाठलं पोलीस ठाणे, नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये रीना नावाच्या कॉलेज तरुणीला सोशल मीडियावर मनीषसोबत प्रेम झालं. मनीषने तिला लग्नाची खोटी वचनं दिली आणि तिचा गैरफायदा घेत शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा रीनाच्या कुटुंबाला याबद्दल कळलं आणि तिने लग्नाबद्दल विचारलं, तेव्हा मनीषने तिला टाळायला सुरुवात केली.

प्रेमाचं नातं किती काळ टिकेल याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही. कधीकधी प्रेमाचं वेड डोक्यात इतकं भिनतं की काही लोक त्यातून बाहेरच पडत नाही. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये राहणाऱ्या रीनासोबत घडला. रीनाने ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, ज्यासोबत लग्नाची स्वप्न पाहिली, सोबत जगण्या मरणाच्या आणाभाका घेतल्या, त्यानेच ऐनवेळी तोंड फिरवलं. यामुळे रीना अजूनही धक्क्यात आहे. पण तिने हार मानली नाही. तिने आपल्या प्रियकरालाही चांगलाच धडा शिकवला.
नेमकं काय घडलं?
उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये राहणारी रीना एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी आहे. ती आपल्या कुटुंबासोबत ट्रोनिका सिटीमध्ये राहते. सध्या ती कॉलेजमध्ये शिकत आहे. अनेकदा मोकळ्या वेळेत ती सोशल मिडिया वापरते. एके दिवशी इन्स्टाग्रामवर असताना तिची २१ वर्षीय मनीषशी ओळख झाली. सुरुवातीला ते दोघेजण इन्स्टाग्रामच्या माध्यामातून चॅट करु लागले. तिने मनीषला त्याच्याबद्दल विचारले असता त्याने मी एका कंपनीत नोकरी करतो, असे सांगितले. त्यानंतर त्या दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले. ते दोघेही दिवस-रात्र एकमेकांशी बोलू लागले. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ते दोघेजण अनेकदा बाहेर भेटू लागले.
यानंतर मनीषने रीनाला खोटी स्वप्न दाखवण्यास सुरुवात केली. मी तुझ्याशी लग्न करेन, असे वचन त्याने तिला दिली. रीना अल्लड असल्याने तिने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि ती त्याच्या जाळ्यात अडकली. यानंतर मनीषने या गोष्टीचा गैरफायदा घेत रीनासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. रीना आणि मनीषच्या प्रेमाबद्दलत तिच्या घरच्यांनाही कुणकुण लागली होती. त्यावेळी रीनाने कुटुंबाला मनीषने माझ्याशी लग्न करण्याचे वचन दिल्याचे सांगितले. त्यामुळे तिच्या कुटुंबाचाही यावर विश्वास बसला.
ही गोष्ट मनीषला समजल्यानंतर त्याने रीनाला टाळण्यास सुरुवात केली. मनीष आपल्याला टाळतोय, हे रीनाला समजत होतं. पण ती सुरुवातीला काहीच बोलली नाही. तिला वाटलं की कदाचित मनीष नोकरीमुळे वेळ देऊ शकत नाही. पण एक मागून एक दिवस जात होते. मनीषचं वागणं दिवसेंदिवस अधिकच बदलत चाललं होतं. एकदा रीनाने मनीषला गाठलं आणि त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यास सुरुवात केली.
यावेळी रीनाने त्याला “तू मला का टाळतो आहेस? तुझ्या आयुष्यात दुसरं कुणी आलंय का?” असे विचारले. त्यावर मनीषने “नाही, माझ्या आयुष्यात सध्या कुणीही नाही.” असे तिला सांगितले. यानंतर रीनाने “तू मला लग्नाचं वचन दिलं आहेस. माझ्या घरच्यांनाही हे माहीत आहे. मी तुझ्यावर प्रेम करते हे सगळ्यांना माहीत आहे. तू माझ्याशी लग्न करशील ना? धोका तर देणार नाही ना?” असा प्रश्न त्याला विचारला. यानंतर मनीषने दिलेले उत्तर ऐकून रीनाच्या पायाखालची जमीनच सरकली.
मनीषला जेलवारी
यानंतर मनीष म्हणाला, “नाही, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. माझ्या घरचे या नात्याच्या विरोधात आहेत. त्यांना तू त्यांची सून व्हावी असं वाटत नाही. त्यामुळे तू माझ्यापासून दूर जा. माझ्याशी कोणताही संपर्क ठेवू नकोस.” यानंतर रीनाला काय बोलावे काहीही सूचत नव्हते. रीनाने त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण मनीषने आपला निर्णय अंतिम असल्याचे सांगितले. यानंतर रीनाने घरच्यांना ही गोष्ट सांगितली आणि २९ जून रोजी ती थेट पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. “मनीषने माझा वापर केला आहे,” असा आरोपही तिने केला. यानंतर पोलिसांनी मनीषला अटक करून न्यायालयात हजर केलं. त्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं.
