AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suchana Seth | मुलगा पतीसारखाच दिसायचा, त्याची आठवण यायची… याच कारणामुळे सूचना सेठने मुलाला संपवलं ?

गोवा मर्डर केसमध्ये रोज नवनवे खुलासे होत आहेत. ४ वर्षांच्या मुलाच्या हत्येच्या आरोपाखाली अटकेत असलेली CEO सूचना सेठ म्हणाली होती की तिच्या मुलाकडे पाहिल की तिला तिच्या (माजी) पतीची आठवण येते. तो अगदी त्याच्यासारखाच दिसतो.

Suchana Seth | मुलगा पतीसारखाच दिसायचा, त्याची आठवण यायची... याच कारणामुळे सूचना सेठने मुलाला संपवलं  ?
| Updated on: Jan 12, 2024 | 10:23 AM
Share

पणजी | 12 जानेवारी 2024 : एका बड्या कंपनीची सीईओ असलेल्या सूचना सेठने तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याने संपूर्ण गोवा हादरलं. हॉटेल कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा गुन्हा उघडकीस आला. या हत्या प्रकरणात आता रोज नवनवे खुलासे होत आहेत. याबाबत आता एक नवी माहिती समोर आली आहे. सूचनाचा लहान मुलगा हा तिच्या (माजी) पतीसारखा दिसायचा. त्याला पाहून मला पतीची आठवण येते, आमच्या तुटलेल्या नात्याची आठवण येते, असं सूचनाने तिच्या कुटुंबियांशी बोलताना सांगितलं होतं.

पतीसोबत वेगळ झाल्यानतंर कोर्टाने सूचनाचा पती रमण याला त्याच्या मुलाला आठवड्यातून एकदा भेटायची परवानगी दिली होती. मात्र सूचनाला हे फारसं आवडलेलं नव्हतं.मुलाची आणि पतीची भेट होऊ नय म्हणूनच ती त्याला गोव्याला घेऊन गेली होती, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र तिथे गेल्यानंतर तिने मुलाचं आयुष्यच संपवलं.

पतीला फोन करून भेटायला बोलावलं

पोलिसांच्या सांगण्यानुसार, सूचनाने तिच्या पतीला फोन केला होता आणि कोर्टाच्या आदेशप्रमाणे तू रविवारी मुलाला भेटायला येऊ शकतोस असं सांगितलं होतं. रमणने तिला मुलासोबत घरी यायला सांगितलं. पण ती सार्वजनिक ठिकाणी भेटण्यावरच ठाम होती.

रमणने दोन तास वाट पाहिली पण

त्यानंतर सूचनाने सांगितलेल्या जागी रमण मुलाला भेटण्यासाठी गेला. तो दोन तास वाट बघत होता. पण ती आली नाही, तेव्हा रमणने तिला फोन, मेसेजेस, मेल सगळं काही केलं पण सूचनाने काहीच रिप्लाय दिला नाही. अखेर तो तिथून निघाला आणि त्यानंतर तो कामासाठी जकार्ताला गेला. त्यानंतर त्याला अचानक मुलाच्या हत्येचीच बातमी समजली. पतीची मुलासोबत भेट होऊ नये म्हणूनच सूचना मुलासोबत गोव्याला गेली होती, अशी माहिती नंतर समोर आली.

गोव्यात गेल्यावर सूचना मुलासोबत फिरली. आणि नंतर ७ जानेवारीला तिने तिच्या पोटच्याच लेकाची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून टॅक्सीत बसून बंगळूरूच्या दिशेने निघाी. मात्र ती ज्या हॉटेलमध्ये राहिली होती, त्या स्टाफला संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळवलं. त्यांनी टॅक्सी ड्रायव्हरला फोन करून गाडी पोलिस स्टेसनला नेण्यास सांगितली. तेथे बॅगमध्ये मुलाचा मृतदेह दिसल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आणि या हत्याकांडाचा खुलासा झाला.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.