AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suchana Seth | तू असं का केलंस , नवऱ्याचा काळीज चिरणारा सवाल, तिचं थंडपणानं उत्तर; काय घडलं?; ‘त्या’ गुन्ह्याची देशभर चर्चा का होतेय ?

Suchana Seth Son Murder Case : वेंकटरमन यांना या त्यांच्या मुलाचा मृतदेह सोपवण्यात आला. त्याने गोवा पोलिसांना सांगितले की, 10 डिसेंबर रोजी आपण आपल्या मुलाची भेट घेतली होती. मात्र पत्नी सूचना हिने न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आणि तिने गेल्या 5 रविवारपासून मुलाला भेटू दिलं नसल्याचा आरोपही वेंकटरमन याने लावला.

Suchana Seth | तू असं का केलंस , नवऱ्याचा काळीज चिरणारा सवाल, तिचं थंडपणानं उत्तर; काय घडलं?; 'त्या' गुन्ह्याची देशभर चर्चा का होतेय ?
| Updated on: Jan 15, 2024 | 1:13 PM
Share

पणजी | 15 जानेवारी 2024 : अवघ्या चार वर्षांच्या मुलाच्या हत्येचा आरोप असलेली, एका कंपनीची सीईओ असलेली सूचना सेठ हिचा शनिवारी गोव्यातील पोलीस ठाण्यात पतीसोबत सामना झाला. बंगळुरूतील एका स्टार्टअप कंपनीची सीईओ असलेली सूचना हिने तिच्या चार वर्षांच्या मुलाची गळा दाबून हत्या केली आणि त्याचा मृतदेह ट्रॉली बॅमघ्ये ठेवून, टॅक्सीत बसून ती गोव्यातून बाहेर पडली. पण पोलिसांच्या हुशारीमुळे तिला अटक करण्यात आली. तेव्हा (तिचे माजी पती) वेंकटरमन देशाबाहेर होते. अखेर शनिवारी त्यांची आणि सूचनाची पोलिस स्टेशनमध्ये भेट झाली. तेव्हा दोघांमध्ये जोरदार वाद झाला. तपासाचा भाग म्हणून वेंकटरमन हे शनिवारी दुपारी बेंगळुरूहून गोव्यातील कळंगुट पोलीस ठाण्यात पोहोचले.

तू असं का केलंस ?

माजी पत्नीच्या समोर आल्यानतर वेंकटरमन यांनी तिला जाब विचारला. तू असं का केलंस असा सवाल, शोकविव्हल पित्याने,वेंकटरमन यांनी सूचनाला केला. मात्र त्यावर तिने थंडपणे उत्तर दिलं. मी हा गुन्हा केलेला नाही, हेच ती पुन्हा-पुन्हा म्हणत होती. (मुलाच्या मृत्यूच्या) या संपूर्ण घटनेसाठी तिने पतीलाच जबाबदार ठरवल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही पती-पत्नी या संपूर्ण घटनेचे खापर एकमेकांवरच फोडत होते, एकमेकांनाच दोषी ठरवत होते.

गोव्यातून सूचना सेठला अटक

8 जानेवारी रोजी माइंडफुल एआय लॅबच्या सीईओ सूचना सेठ हिला गोव्यातून अटक करण्यात आली. एका टॅक्सीज बसलेली सूचना ही तिच्या मुलाचा मृतदेह एका बॅगेत भरून बंगळुरूच्या दिशेने जात असताना पोलिसांनी तिला अटक केली. सूचना सेठने गोव्यातील एका हॉटेलच्या खोलीत तिच्या मुलाचा गळा दाबून खून केला आणि नंतर तिच्या मनगटाची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले. ही दुर्दैवी घटना घडली तेव्हा तिचा माजी पती वेंकटरमन हा इंडोनेशियामध्ये होता. सूचना आणि तिचा पती विभक्त झाले होते आणि मुलाच्या कस्टडीवरून त्या दोघांमध्ये वाग सुरू होता, न्यायालयात खटला सुरू होता.

पतीला मुलाचा ताबा मिळू नये अशी सूचनाची इच्छा होती. याच वादातून तिने हे हृदयद्रावक कृत्य केले, असा आरोप तिच्यावर आहे. आपल्या मुलाचा चेहरा हा पतीची , मोडलेल्या संसाराची आठवण करून देतो, असे सूचनाने अनेकवेळा तिच्या कुटुंबियांसमोर, मित्र-मंडळींसमोर बोलून दाखवले होते. पीटीआयशी बोलताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सूचना ज्या हॉटेलमध्ये राहिली तेथेक कफ सिरपच्या दोन बाटल्या सापडल्या. सूचनाने आपल्या मुलाला औषधाचा भारी डोस दिला आणि नियोजित कट रचून ही हत्या केली, असा अंदाज लावण्यात येत आहे.

‘पोस्टमॉर्टममध्ये असे दिसून आले आहे की मुलाचा गळा दाबून खून करण्यात आला, मात्र त्याने कोणताच संघर्ष, झटापट केली नाही. सूचनाने मुलाला मारण्यापूर्वी त्याला कफ सिरपचा जड डोस दिला की नाही हे देखील जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत’ असे पोलिसांनी सांगितले.

वडिलांच्या ताब्यात देण्यात आला मुलाचा मृतदेह

या आठवड्याच्या सुरूवातीलाच वेंकटरमन यांना त्यांच्या मुलाचा मृतदेह सोपवण्यात आला. त्याने शनिवारी गोवा पोलिसांना सांगितले की, 10 डिसेंबर रोजी आपण मुलाची (शेवटची) भेट घेतली होती. मात्र पत्नी सूचना हिने न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आणि तिने गेल्या 5 रविवारपासून मुलाला भेटू दिलं नसल्याचा आरोपही वेंकटरमन याने लावला.  बंगळुरूतील एका कौटुंबिक न्यायालयात सूचना आणि माझी घटस्फोटाची केस सुरू आहे. रमण यांनी दावा केला की न्यायालयाने त्यांना भेटीचे अधिकार दिले होते परंतु सेठने गेल्या पाच रविवारपासून त्यांना त्यांच्या मुलाला भेटू दिले नाही. जेव्हा मुलाची हत्या झाली तेव्हा रमण हे कामानिमित्त इंडोनेशियातील जकार्ता येथे गेले होते. या हत्येप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.