AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्राहक बनून आला अन् दागिने चोरुन गेला, घटना सीसीटीव्हीत कैद

ग्राहक बनून आलेल्या चोरट्याने 5 लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्राहक बनून आला अन् दागिने चोरुन गेला, घटना सीसीटीव्हीत कैद
पुण्यात ज्वेलर्सच्या दुकानात चोरीImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Feb 27, 2023 | 8:44 PM
Share

पुणे / अभिजीत पोते : भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानातून 69 ग्रॅम वजनाचे दागिन्यांची चोरी केल्याची खळबळजनक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. ग्राहक बनून आलेल्या चोरट्याने 5 लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दागिने घेऊन आरोपी फरार झाला असून, पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.

भवानी पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानात घडली घटना

पुण्यातील भवानी पेठेत एका ज्वेलर्सच्या दुकानात दुपारी पावणे चारच्या सुमारास एक चोरटा ग्राहक बनून दुकानात आला. चोरट्याने दुकानात आधी एक ग्रॅम सोने खरेदी केले. नंतर त्या इसमाने दुकानदाराला आणखीन काही दागिने दाखवायला सांगितले. दुकानदाराने असे जवळपास 69 ग्रॅमचे दागिने त्याला दाखवले.

हातचलाखी करत दागिने लंपास

दागिने बघत बघता तो पाच मिनिटाने बाहेर गेला. त्यानंतर बाहेरून त्याने छोटी छोटी दगड आपल्या खिशात टाकून आत आणले. दुकानदाराचे लक्ष नसताना ते छोटे दगड दागिन्यांच्या पाकिटात ठेवले आणि दागिने बघत बघत हळूच त्याने ते दागिने खिशात ठेवले. नंतर तो फोनवर बोलण्याच्या कारणाने बाहेर आला आणि तिथून फरार झाला.

खडक पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल

चोरीची बाब लक्षात येताच दुकानदाराने खडक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दुकानदाराच्या तक्रारीनुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध सुरु केला आहे.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...