प्रियकराचं दुसऱ्याशी लग्न जुळलं, प्रेयसी वरात घेऊन दारात, ढोल-ताशा वाजवत हाय व्होल्टेज ड्रामा

प्रियकराचं दुसऱ्याशी लग्न जुळलं, प्रेयसी वरात घेऊन दारात, ढोल-ताशा वाजवत हाय व्होल्टेज ड्रामा
प्रातिनिधिक फोटो

एका मुलीच्या प्रियकराचं दुसऱ्या मुलीशा लग्न जुळलं. त्यानंतर मुलाच्या प्रेयसीने ढोल-ताशा घेऊन मुलाच्या दारी वरातच काढली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय (Gorakhpur girl protest with band opposite to lovers house video goes viral).

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: चेतन पाटील

Jun 03, 2021 | 7:22 PM

लखनऊ : कवी इंद्रजीत घुले यांची ‘प्रेमात फार वेळा काय होते? प्रेम तिच्यावर करायचं आणि घराभोवती फिरायचं’, अशी एक कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. या कवितेत एका तरुणाचं तो राहत असलेल्या गल्लीतल्या एका तरुणीवर एकतर्फी असलेलं प्रेम व्यक्त करण्यात आलं होतं. ही कविता विनोदी होती. मात्र, तशा अनेक घटना वास्तवातही घडतायत. उत्तर प्रदेशातील गोरखपूर शहरात अशीच एक घटना समोर आलीय. पण ही घटना थोडीशी वेगळी आहे. एका मुलीच्या प्रियकराचं दुसऱ्या मुलीशा लग्न जुळलं. त्यानंतर मुलाच्या प्रेयसीने ढोल-ताशा घेऊन मुलाच्या दारी वरातच काढली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय (Gorakhpur girl protest with band opposite to lovers house video goes viral).

नेमकं प्रकरण काय?

गोरखपूरच्या रामपूर रकबा येथे वास्तव्यास असलेला संदीप मौर्या या तरुणाचं त्याच्याच समाजाच्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तो सैन्याची परीक्षा पास झाला होता. त्यामुळे सैन्यात शिपाई म्हणून भरती झाला. त्यानंतरही त्याचे प्रेयसीसोबत संबंध होते. मात्र, त्याच्या कुटुंबियांनी त्याचं लग्न दुसऱ्या मुलीशी जुळवलं. याबाबत संदीपच्या प्रेयसीला माहिती मिळताच तिचा रागाचा पारा चढला. तिने थेट पोलिसात धाव घेतली. तिने झंगहा पोलीस ठाण्यात तिच्या प्रियकराच्या विरोधात एफआयआर दाखल केली. ती एवढ्यावरच थांबली नाही. तर ती ढोल-ताशा आणि नातेवाईकांना घेऊन थेट संदीपच्या घरी दाखल झाली.

‘लग्न झालं नाही तर जीव देईन’, तरुणीची धमकी

संदीपच्या प्रेयसीने त्याच्या घराबाहेर ढोल-ताशाच्या गजरात आंदोलनच सुरु केलं. संदीपचं लग्न तिच्यासोबत झालं नाही तर त्याच्या घरासमोर आत्महत्या करेन, अशी धमकी तिने संदीपच्या कुटुंबियांना दिली. हा सर्व हाय व्होल्टेज ड्रामा सुरु असताना संदीपच्या घराबाहेर बघ्यांची मोठी गर्दी उसळली. अखेर या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मुलीची कशीतरी समजूत घालून घरी पाठवलं.

पोलिसांची भूमिका

कुणी कुणासोबत लग्न करावं यासाठी कुणावरही दबाव टाकता येऊ शकत नाही. याशिवाय मुलाचं पहिलं लग्न आहे. त्यामुळे त्याला रोखता येऊ शकत नाही, अशी भूमिका पोलिसांनी मांडली आहे. पोलिसांनी मुलीची समजूत घालून कायदेशीर पद्धतीने आपली बाजू मांडण्याचा सल्ला दिला (Gorakhpur girl protest with band opposite to lovers house video goes viral).

तरुणीची भूमिका

दुसरीकडे तरुणी माघार घेण्यास तयार नाही. “माझी दोन वर्षांपूर्वी संदीपसोबत ओळख झाली. तो घरीदेखील येत-जात असायचा. त्याने लग्नाचं आमिष दाखवून शरीर संबंध ठेवले. या दरम्यान तो सैन्यात भरती झाला आणि ट्रेनिंगसाठी जाऊ लागला. ट्रेनिंगदरम्यान तो अधीमधी घरी यायचा आणि शरीर संबंध बनवायचा. मात्र, सैन्यात भरती झाल्यानंतर तो लग्नाच्या आश्वासनापासून दूर गेला”, अशी भूमिका तिने मांडली.

हेही वाचा : नवरा-बायकोमध्ये कडाक्याचं भांडण, मध्येच गॅलरी तुटली अन् घडला भीषण अपघात, घटना कॅमेऱ्यात कैद

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें