Video | नवरा-बायकोमध्ये कडाक्याचं भांडण, मध्येच गॅलरी तुटली अन् घडला भीषण अपघात, घटना कॅमेऱ्यात कैद

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 03, 2021 | 5:32 PM

या व्हिडीओमध्ये नवरा-बायकोमध्ये कडाक्याचे भांडण झाले आहे. हे भांडण एवढे टोकाचे आहे की, यामध्ये भांडणादरम्यान मोठा अपघात झाला आहे. (husband and wife fall from balcony)

Video | नवरा-बायकोमध्ये कडाक्याचं भांडण, मध्येच गॅलरी तुटली अन् घडला भीषण अपघात, घटना कॅमेऱ्यात कैद
HUSBAND WIFE CLASH

Follow us on

मुंबई : पती-पत्नीचं नातं मोठं गूढ असतं. या नात्यामध्ये कधी गोड आणि खट्याळ क्षण अनुभववायला येतात. तर कधी या नात्यात कडाक्याचे भांडणसुद्धा होतात. पती-पत्नींच्या या नात्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हासुद्धा असाच आहे. या व्हिडीओमध्ये नवरा-बायकोमध्ये कडाक्याचे भांडण झाले आहे. हे भांडण एवढे टोकाचे आहे की, यामध्ये भांडणादरम्यान मोठा अपघात झाला आहे. (Husband and Wife fall from balcony while fighting video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरा आणि बायको यांच्यात कडाक्याचे भांडण सुरु आहे. घराच्या पहिल्या मजल्यावर या जोडीचे भांडण सुरु आहे. दोघेही गॅलरीमध्ये एकमेकांना भांडत आहे. सुरुवातीला त्यांचे भांडण हे शाब्दिक स्वरुपाचे असावे. एकमेकांना टोकाचे बोलून त्यांच्यात भांडण वाढत गेल्याचे दिसतेय. त्यानंतर या दोघांमध्ये थेट गॅलरीमध्येच धक्काबुक्की सुरु झाली आहे. हे भांडण एवढे टोकाचे झाले आहे की, यामध्ये पत्नी आपल्या पतीला थेट मारत आहे.

गॅलरी तुटली आणि दोघेही पडले

व्हिडीओमध्ये दोघांचेही कडाक्याचे भांडण होत असल्याचे दिसतेय. एकमेकांना धक्काबुक्की करताना ते दोघेही गॅलरीच्या खाली कोसळले आहेत. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दोघेही गॅलरीमधून धाडकन् खाली पडल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असून दोघेही रस्त्यावर निपचित पडले आहेत. कसलीही हालचाल करत नसल्यामुळे त्यांना जबर मार लागला असावा असा अंदाज आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला ‘Heels Pops Chairshots’ या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे. सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. नवरा आणि बायको गॅलरीतून खाली कोसळल्यामुळे लोक भन्नाट कमेंट्स करत आहेत. तसेच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

इतर बातम्या :

Video | बिबट्याची थेट पाण्यात उडी, एका सेकंदात मगरीची शिकार, पाहा थरारक व्हिडीओ

VIDEO | लॉकडाऊनमध्ये फिरताना पोलिसांनी हटकलं, पठ्ठ्या म्हणतो, माझ्या कोंबडीच्या पोटात दुखतंय

Viral Video : भर मंडपात नवरीने डोळे मिचकावले, केला ‘असा’ इशारा की सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

(Husband and Wife fall from balcony while fighting video goes viral on social media)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI