बॉयफ्रेण्डसोबत वाजलं, 14 व्या मजल्यावरुन उडी मारत परदेशी युवतीची आत्महत्या

ग्रेटर नोएडामधील कासा ग्रँड हाऊसिंग सोसायटीमधील टॉवर बीच्या फ्लॅट क्रमांक-1107 मध्ये 26 वर्षीय तरुणी विनिमान्यासा इडम्बो राहत होती. घरात सापडलेल्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर विनिमान्यासा मूळची केनियन असल्याचे पोलिसांना समजले.

बॉयफ्रेण्डसोबत वाजलं, 14 व्या मजल्यावरुन उडी मारत परदेशी युवतीची आत्महत्या
डॉ. रेखा कदम यांच्या घराची झडती, काळवीटाचे कातडे जप्त
| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 11:58 AM

लखनौ : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये उंच इमारतीवरुन उडी मारल्यामुळे मृत्यू होण्याच्या घटना अनेकदा समोर येतात. रविवारी ग्रेटर नोएडातील एका हाऊसिंग सोसायटीत आत्महत्येची आणखी एक घटना समोर आली आहे. एका परदेशी तरुणीने 14 व्या मजल्यावरुन उडी मारुन आयुष्याची अखेर केली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुणी मूळ केनियाची रहिवासी होती. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ग्रेटर नोएडामधील कासा ग्रँड हाऊसिंग सोसायटीमधील टॉवर बीच्या फ्लॅट क्रमांक-1107 मध्ये 26 वर्षीय तरुणी विनिमान्यासा इडम्बो राहत होती. घरात सापडलेल्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर विनिमान्यासा मूळची केनियन असल्याचे पोलिसांना समजले.

परदेशी युवतीचा बॉयफ्रेण्डसोबत वाद

प्राथमिक तपासात ही तरुणी गेल्या अनेक महिन्यांपासून या सोसायटीच्या फ्लॅटमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या परदेशी तरुणीला भेटण्यासाठी मानसे नावाचा केनियन तरुण टुरिस्ट व्हिसावर भारतात आला होता. त्यांच्यात काही कारणावरुन वाद झाला होता, त्यानंतर रविवारी सकाळी विनिमान्यासाने टोलेजंग इमारतीतील फ्लॅटच्या 14 व्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती आहे. पोलीस पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत असून तरुणीच्या प्रियकराची चौकशी केली जात आहे.

ग्रेटर नोएडामध्ये इमारतीतून पडून मृत्यूच्या घटना वाढत्या

ग्रेटर नोएडातील सोसायट्यांमध्ये अशी प्रकरणे वारंवार समोर येत आहेत. यापूर्वी 18-19 डिसेंबर रोजी ग्रेटर नोएडाच्या हायप्रोफाईल सोसायटीतील 24 वर्षीय तरुणी सातव्या मजल्यावरून पडली होती. तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलीच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली असून ती कोमात आहे. संबंधित युवती फ्लॅटच्या खिडकीतून खाली पडली तेव्हा ती नग्नावस्थेत होती.

संबंधित बातम्या :

पिंपरी पोलिसांची मोठी कारवाई ; योगेश जगताप हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश

मूल होत नसल्याने भाचीला पळवलं, मावशीसह नवऱ्यालाही अटक

ट्रकसमोर बाईक आडवी घातली, कोयत्याच्या धाकाने चालकाला लुटलं, अल्पवयीन मुलासह दोघे जेरबंद