AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधुचंद्राच्या रात्री नवरीची फोनवर ‘ती’ चर्चा… खोलीच्या बाहेरच संवाद ऐकून नवरदेव पळाला थेट पोलीस ठाण्यात

मध्यप्रदेशात दरदरून घाम फुटावा अशी घटना घडली आहे. एका तरुणाची लग्नाच्या नावाने घोर फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे. जिला पाहिलं होतं, पसंत केलं होतं, तिच्याऐवजी भलत्याच मुलीशी लग्न झाल्याने या तरुणाला धक्का बसला. पण गोष्ट इथेच थांबली नाही, त्यानंतर त्याने नवरीचं संभाषण ऐकल्यावर जे कळलं त्याने तर त्याला घामच फुटला.

मधुचंद्राच्या रात्री नवरीची फोनवर 'ती' चर्चा... खोलीच्या बाहेरच संवाद ऐकून नवरदेव पळाला थेट पोलीस ठाण्यात
Crime NewsImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 22, 2025 | 6:21 PM
Share

मध्यप्रदेशातील राजगडमध्ये एका तरुणाची लग्नाच्या नावाने फसवणूक करण्यात आली आहे. सात फेरे घेतल्यानंतर दुसऱ्या त्याने नवरीचा घुंगट उचलला. तेव्हा त्याला कळलं की जिला पाहून लग्न केलं ती मुलगी ही नाहीच. दाखवली एक आणि लग्न भलतीशीच लावलं. त्यामुळे या तरुणाने थेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे पोलिसांनी अधिक तपास केल्यावर ज्या मुलीशी लग्न लावून दिलं तिचं आधीच लग्न झाल्याचं उघड झालं आहे. या लग्नाचा व्यवहार 11 लाख रुपयात झाला होता. यात 5.75 लाख रूपये मुलीच्या बापाला दिले गेले. तर बाकीचे 5 लाख 25 रुपये कालू सिंह नावाच्या दलाला दिले गेले.

पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करून पाच आरोपींना अटक केली आहे. हे प्रकरण राजगड जिल्ह्यातील लीमा चौहान पोलीस ठाणे क्षेत्रातील बुढनपूर गावातील आहे. येथील रहिवासी कमल सिंह सोंधिया यांचं लग्न सुसनेर येथे राहणाऱ्या मुलीशी ठरलं होतं. 14 एप्रिल रोजी खिलचीपूरच्या लिम्बोदा गावात सामूहिक विवाह सोहळा पार पडला होता. ही नवरी दागिने आणि पैसे घेऊन पळण्याच्या तयारीत होती.

वाचा: सासूशी लग्न करणाऱ्या जावयाला वडिलांनी हकलले घरा बाहेर, पत्नीने लगेच तयार केला दुसरा प्लान

सुहागरातीला काय बोलली?

पीडीत नवरदेवाचं नाव कमल आहे. त्याने पोलिसांना सर्व घटना सविस्तर सांगितली. मी मधुचंद्राच्या रात्री जेव्हा खोलीत गेलो तेव्हा नवरी कुणाशी तरी फोनवर बोलत होती. घरच्यांना आणि कमलला झोपेच्या गोळ्या देऊन नंतर दागिने आणि पैसे घेऊन पळून जाणार असल्याचं ती फोनवर सांगत होती. कमलने त्याच्या बायकोचं फोनवरचं बोलणं ऐकलं. त्यामुळे त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. संशय आल्याने त्याने तिचा घुंगट उचलला. तेव्हा नवरीचा चेहरा पाहताच त्याला धक्का बसला.

बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी

ज्या मुलीला पाहून लग्न केलं होतं, ती ही मुलगी नव्हती असं कमल म्हणाला. जेव्हा मी तिला या प्रकरणात केस दाखल करण्याबाबत बोललो तेव्हा तिने बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. कमलने तिला या बाबत विचारलं असता तिने सर्व आऱोप फेटाळले. त्यानंतर तिने सर्व घटना सांगितली. मी राधा नसून सलोनी असल्याचं ती म्हणाली. बिल्लोद येथील राहणारी असून आधीच लग्न झालेलं आहे.

दागिने पळवण्याचं षडयंत्र

जोरावर सिंह, त्याची बायको, कालू सिंह, बालू सिंह आणि तिने मिळून कमलला फसवल्याचं तिने सांगितलं. जोरावरने प्लान रचून पैसे पळवले. त्याने भोपाळमधील एक तरुण आणि महिलेशी मिलिभगत करून मला इथे पाठवलं. घरातील दागिने घेऊन पळून ये असं जोरावर सिंहने सांगितल्याचं ती म्हणाली. 15 एप्रिल रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी पाच जणांना अटक केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.