AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न झालं नसताना परदेशात प्रेग्नेंट झाली, भारतात मुलं झालं, पण पुढे तिला जेलमध्ये जावं लागलं, कारण…

परदेशात असताना तिचे प्रेमप्रकरण जुळले. मग सर्व भान विसरुन त्याच्याशी शरीरसंबंधही ठेवले. भारतात परतताच त्या दोघांच्या प्रेमाचा अंकुर तिच्या पोटात वाढत असल्याचे कळले. मग कुमारी माता म्हणून बदनामी होईल या भीतीने तिने जे केले ते भयानक होते.

लग्न झालं नसताना परदेशात प्रेग्नेंट झाली, भारतात मुलं झालं, पण पुढे तिला जेलमध्ये जावं लागलं, कारण...
बदनामीच्या भीतीने तरुणीने नवजात बालिकेला फेकले
| Updated on: Apr 22, 2023 | 1:32 PM
Share

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटना उघड होताच पोलिसांसह सर्वच चक्रावले. एका तरुणीने आपल्या नवजात मुलीला इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन खाली फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे. अहमदाबादमधील चंद्रखेडामध्ये ही धक्कदायक घटना घडली आहे. तरुणी कुमारी माता आहे. यामुळेच बदनामी टाळण्यासाठी तिने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

तरुणी काही कालावधीसाठी परदेशात गेली होती

सदर तरुणी ही अहमदाबादमधील चंद्रखेडा येथील रहिवासी असून, ती काही कालावधीसाठी परदेशी गेली होती. तिथे तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. प्रेमसंबंधातून दोघांमध्ये शारीरिक संबंधही झाले. यानंतर तरुणी भारतात परत आली. अहमदाबाद येथे आपल्या घरी परतल्यानंतर तिला आपण गरोदर असल्याचे समजले. यानंतर ती हैराण झाली.

परदेशातून आल्यानंतर तिने मुलीला जन्म दिला

काही महिन्यांनी तिने एका मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर कुमारी माता म्हणून आपली बदनामी होईल या भीतीने तिने नवजात मुलीला राहत्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन खाली फेकले. इमारतीखाली नवजात बालिकेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मुलीचा मृतदेह ताब्यात घेत घटनेचा तपास सुरु केला.

बदनामीच्या भीतीने मुलीला फेकले

बराच तपास केल्यानंतर पोलिसांना अखेर प्रकरणाचा सुगावा लागला. पोलिसांनी आरोपी तरुणीचा शोध घेत अखेर तिला ताब्यात घेतले. तरुणीची चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. परदेशात प्रियकराशी शारीरिक संबंधातून आपण गरोदर राहिल्याने बदनामीच्या भीतीने आपण हे कृत्य केल्याचे कबुल केले.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.