AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Hundred Auction : थांबून बॉलिंग करणाऱ्या उस्मान तारीकची चांदी, ऑक्शनमध्ये कोटींचा भाव, बॉलर मालामाल

Usman Tariq The Hundred Auction: उस्मान तारीक द हंड्रेड ऑक्शनमध्ये मालमाल झाला. उस्मानला या ऑक्शनमधील सर्वात महागडा पाकिस्तानी खेळाडू ठरला. उस्मान त्याच्या हटके बॉलिंग एक्शनमुळे चर्चेचा विषय ठरला आहे.

The Hundred Auction : थांबून बॉलिंग करणाऱ्या उस्मान तारीकची चांदी, ऑक्शनमध्ये कोटींचा भाव, बॉलर मालामाल
Pakistan Usman Tariq The Hundred AuctionImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 12, 2026 | 7:16 PM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत पाकिस्तानचा फिरकीपटू उस्मान तारीक चांगलाच चर्चेत आला. उस्मान तारीक त्याच्या बॉलिंग एक्शनमुळे चर्चेत राहिला. उस्मानने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानसाठी योगदान दिलं. मात्र पाकिस्तानचं सुपर 8 फेरीतूनच पॅकअप झालं. पाकिस्तान सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. पाकिस्तानची बांगलादेश विरूद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पराभवाने सुरुवात झाली. बांगलादेश विरुद्ध पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला बुधवारी 11 मार्च रोजी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पाकिस्तानवर सडकून टीका केली जात आहे. अशात उस्मान तारीक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

उस्मानला कोटींचा भाव

उस्मानला द हंड्रेड 2026 या स्पर्धेसाठीच्या ऑक्शनमध्ये कोटींचा भाव मिळाला आहे. या स्पर्धेतील फ्रँचायजीचे बहुतांश मालकांचा थेट भारताशी संबंध आहे. त्यामुळे उस्मानला कुणी घेणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र उस्मानला त्याच्या बेस प्राईजपेक्षा किती तरी लाख रुपये जास्त मिळाले आहेत.

ऑक्शनसाठी एकूण 14 पाकिस्तानी खेळाडूंकडून नोंद

या स्पर्धेतील ऑक्शनसाठी एकूण 14 पाकिस्तानी खेळाडूंकडून नावनोंदणी करण्यात आली होती. मात्र ऐन क्षणी शाहीन शाह अफ्रिदी याने माघार घेतली. त्यामुळे इतर खेळाडूंना काय भाव मिळतो? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष होतं. मात्र उस्मान तारीकला ऑक्शनमध्ये चांगला भाव मिळाला.

उस्मान या ऑक्शनमधील सर्वात महागडा पाकिस्तानी खेळाडू ठरला. उस्मानची बेस प्राईज ही 3 कोटी 75 लाख पाकिस्तान रुपये होती. भारतीय रुपयांमध्ये हाच आकडा 1 कोटी 23 लाख रुपये इतका होता. त्यामुळे उस्मानसाठी कोटींची बोली कोण लावणार? याकडे क्रिकेट वर्तुळाचं लक्ष होतं. मात्र उस्मान सरस ठरला.

उस्मानला आपल्या गोटात घेण्यासाठी बर्मिंघम फिनिक्स आणि ट्रेन्ट रॉकेट्स यांच्याच चुरस पाहायला मिळाली. मात्र अखेर बर्मिंघम फिनिक्स टीमने बाजी मारली. बर्मिंघम फिनिक्स टीमने उस्मानसाठी 1 कोटी 73 लाख भारतीय रुपये मोजत त्याला आपल्या गोटात घेतलं.

उस्मान तारीक मालामाल

उस्मानची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

दरम्यान उस्मान तारीक याने पाकिस्तानचं 9 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. उस्मानने या 9 सामन्यांमध्ये एकूण 18 विकेट्स मिळवल्या आहेत. उस्मानने या दरम्यान 2 वेळा 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे आता उस्मान या द हंड्रेड या स्पर्धेत कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल