AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Laxmikant Berde : लक्ष्मीकांत बेर्डेंपासून जरा सावध राहा…सलमान खानला देण्यात आलेली तंबी, काय घडलेलं?

Laxmikant Berde On Salman Khan : लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जुन्या मुलाखतीत सलमान खानचा किस्सा सांगितला होता.

Laxmikant Berde : लक्ष्मीकांत बेर्डेंपासून जरा सावध राहा...सलमान खानला देण्यात आलेली तंबी, काय घडलेलं?
| Updated on: Nov 06, 2026 | 7:33 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या अभिनयाच्या आठवणी आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. मराठी चित्रपटांसोबतच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. विशेष म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्यासोबतही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. या दोघांची पडद्यावरची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडली. मात्र, सुरुवातीच्या काळात सलमान खान लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी बोलायलाही घाबरायचा, असा एक मजेशीर किस्सा स्वतः लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एका मुलाखतीत सांगितला होता.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. ते मराठीतील लोकप्रिय सुपरस्टार म्हणून ओळखले जात होते. दुसरीकडे, सलमान खान त्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीत नुकताच आपली कारकीर्द घडवत होता. त्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांची लोकप्रियता आणि त्यांचा कामाचा अनुभव पाहून सलमान काहीसा दबावाखाली असायचा.

एका मुलाखतीत हिंदी कलाकारांसोबत काम करताना काही वेगळे अनुभव आले का, असा प्रश्न लक्ष्मीकांत बेर्डे यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, मराठी चित्रपटसृष्टीत आपलं मोठं नाव असल्यामुळे हिंदी कलाकारही आपल्याशी वागताना थोडे सावध असायचे.

‘मैने प्यार किया’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगताना लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाले होते की, सलमान खानला कोणीतरी सांगितलं होतं की, लक्ष्मीकांत बेर्डेंपासून जरा सावध राहा. ते ऐनवेळी काहीतरी वेगळं करू शकतात किंवा अचानक अडचणीत आणू शकतात, अशी त्याला ताकीद देण्यात आली होती. त्यामुळे सुरुवातीला सलमान त्यांच्याशी फारसं बोलत नसायचा. हे लक्षात आल्यानंतर लक्ष्मीकांत यांनी स्वतःहून सलमानशी संवाद साधला. त्यांनी सलमानला समजावलं की, जोपर्यंत दोघांमध्ये चांगलं ट्युनिंग तयार होत नाही, तोपर्यंत पडद्यावरचे सीनही चांगले होणार नाहीत. लक्ष्मीकांत यांनी पुढे सांगितलं की, सलमान स्वभावानं चांगला मुलगा होता. नंतर दोघांमध्ये चांगले मैत्री झाली.

‘मैने प्यार किया’ चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री भाग्यश्री मुख्य भूमिकेत होती. भाग्यश्री महाराष्ट्रीयन असल्यामुळे आणि ती आधीपासूनच लक्ष्मीकांत बेर्डे यांची चाहती असल्यामुळे दोघांचं ट्युनिंग सुरुवातीपासूनच छान जुळलं होतं. मात्र, सलमान आणि लक्ष्मीकांत यांच्यात मैत्री निर्माण होण्यासाठी थोडा वेळ लागला. पुढे हळूहळू त्यांच्यातील संकोच दूर झाला आणि चांगला संवाद सुरू झाला.

चित्रपटातील एका सीनचं शूटिंग सुरू असताना लक्ष्मीकांत बेर्डे यांनी स्वतःहून दिग्दर्शकाला एक विनंती केली होती. आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडेच जाईल, त्यामुळे या सीनमध्ये आपल्याला थोडं कमी दाखवावं, असं त्यांनी दिग्दर्शकाला सांगितलं होतं. मात्र, सलमान खानला त्यांची ही भूमिका मान्य नव्हती. त्यावर लक्ष्मीकांत यांनी त्याला मराठी चित्रपटसृष्टीतील काम करण्याची पद्धत समजावून सांगितली. मराठी कलाकार एकमेकांसोबत मिळून-मिसळून काम करतात आणि एकमेकांना सांभाळून घेतात. त्यामुळे संपूर्ण टीमचं काम अधिक चांगलं होतं, असं त्यांनी सलमानला सांगितलं होतं.

दरम्यान, ‘मैने प्यार किया’नंतर लक्ष्मीकांत बेर्डे आणि सलमान खान यांनी ‘हम आपके है कौन’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्येही एकत्र काम केलं. त्यांच्या विनोदी अभिनयानं हिंदी प्रेक्षकांचीही मनं जिंकली.

Follow Us
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल...
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; क्रीडा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा दावा