AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव पोलिसांच्या ताब्यात, काय आहे प्रकरण?

Harshvardhan Jadhav Arrested : हर्षवर्धन जाधव अनेक वॉरंट निघूनही न्यायालयात हजर होत नव्हते.त्यामुळे न्यायालयाचे निर्देशानुसार त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट काढण्यात आले होते. आज ते नागपूरात न्यायालयात उपस्थित झाल्यावर नागपूर पोलिसांना न्यायालयाने अटक करण्याचे निर्देश दिले.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव पोलिसांच्या ताब्यात, काय आहे प्रकरण?
Harshvardhan Jadhav
| Updated on: Feb 17, 2025 | 9:40 PM
Share

Harshvardhan Jadhav Arrested : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नागपूर पोलिसांनी त्यांना न्यायालयाच्या आदेशानंतर ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल केली असून उपाचारानंतर अटक करण्यात येणार आहे. अनेक वर्षांपूर्वीच्या एक गुन्ह्यात वारंवार वॉरंट बजावून हजर झाले. त्यामुळे त्यांना अटक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर नागपूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सरकारी कामात अडथळा आणण्याचे हे प्रकरण आहे.

काय आहे प्रकरण

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई केली आहे. सन २०१४ साली नागपूर विमानतळावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शासकीय स्वीय सहाय्यकाला त्यांनी शिविगाळ करत मारहाण केली होती. त्यामुळे या प्रकरणी त्यांच्यावर सोनेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणावरुन कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयात दोषारोपत्र दाखल झाले होते.

अनेक वॉरंट नंतरही गैरहजर

हर्षवर्धन जाधव अनेक वॉरंट निघूनही न्यायालयात हजर होत नव्हते.त्यामुळे न्यायालयाचे निर्देशानुसार त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट काढण्यात आले होते. आज ते नागपूरात न्यायालयात उपस्थित झाल्यावर नागपूर पोलिसांना न्यायालयाने अटक करण्याचे निर्देश दिले. अटक करुन त्यांना मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

रुग्णालयात दाखल

हर्षवर्धन जाधव यांना ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मेयो रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यामुळे त्यांना पुढील 24 तास डॉक्टरांच्या देखरेखे खाली ठेवण्यात येणार आहे. उपचारानंतर जाधव यांनी रितसर अटक करण्यात येणार आहे. रुग्णालयात सोनेगाव पोलीस लक्ष ठेवून असणार आहे.

मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.