चंदिगढ : महिला हेड कॉन्स्टेबल (Lady Head Constable) आणि तिच्या पतीचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हरियाणातील फरिदाबादमध्ये (Faridabad Haryana) हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. सेक्टर-31 येथील पोलीस लाईनमधील घरी हे दाम्पत्य मृतावस्थेत (Couple found dead) आढळले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून तपास सुरु केला आहे. ही घटना घडली त्यावेळी त्यांचा 11 वर्षांचा मुलगा घरी नव्हता. परीक्षेसाठी तो शाळेत गेला होता, मात्र घरी येऊन पाहिल्यानंतर त्याला आई-वडील मृतावस्थेत दिसल्याने त्याला मोठा धक्का बसला.