AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडिलांवर विश्वास ठेवून 12 वर्षांच्या मुलाने दार उघडलं, त्यानंतर त्याने मृत्यूचा थरार डोळ्यादेखत पाहिला

दिल्लीला लागून असलेल्या हरियाणा राज्यातील फरिदाबाद जिल्ह्यातील धौज पोलीस स्टेशन परिसरात गुरुवारी मध्यरात्री एका तरुणाने त्याच्या साथीदारासोबत मिळून पत्नी, सासू, मेव्हणा आणि त्याच्या मित्रावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये मुख्य आरोपीची पत्नी, सासू आणि मेहुण्याच्या मित्राचा समावेश आहे.

वडिलांवर विश्वास ठेवून 12 वर्षांच्या मुलाने दार उघडलं, त्यानंतर त्याने मृत्यूचा थरार डोळ्यादेखत पाहिला
खेडमधील हत्येचे गूढ उकलले; सोन्याच्या दागिन्यांसाठी केली वृद्धाची हत्या
| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 8:41 AM
Share

नवी दिल्ली : दिल्लीला लागून असलेल्या हरियाणा राज्यातील फरिदाबाद जिल्ह्यातील धौज पोलीस स्टेशन परिसरात गुरुवारी मध्यरात्री एका तरुणाने त्याच्या साथीदारासोबत मिळून पत्नी, सासू, मेव्हणा आणि त्याच्या मित्रावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये मुख्य आरोपीची पत्नी, सासू आणि मेहुण्याच्या मित्राचा समावेश आहे.

हल्लेखोराच्या पत्नीचा भाऊ जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल झाला आहे. गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी हत्येत वापरलेली हत्यारे, चाकू आणि मोटारसायकली जप्त केल्या आहेत. आरोपी आणि मुख्य सूत्रधार नीरजला पत्नी आयेशाच्या चारित्र्यावर संशय होता. या तिहेरी हत्येचे आणखी एक कारण म्हणजे मुख्य सूत्रधाराचा पत्नीच्या भाऊ गगनसोबत 10 लाख रुपयांचा व्यवहारही सुरु होता.

आनंदात विर्जन – 

गगनच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी धौज पोलीस ठाण्यात हत्या, खुनाचा प्रयत्न, शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तिहेरी हत्येचे प्रत्यक्षदर्शी आणि जखमी झालेले गगन यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. हे कुटुंब मुळात हरियाणा राज्यातील पानिपत येथील समलखा येथील रहिवासी आहे. फरिदाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गगनने सांगितले की, त्याच्या कुटुंबियांनी बहीण आयशाचा विवाह एनआयटी-A मध्ये राहणारा नीरज चावला याच्याशी 13-14 वर्षांपूर्वी केला होता.

लग्नानंतर आरोपी नीरज पत्नीच्या चारित्र्यावरही संशय घेत असे. यामुळे दाम्पत्यामध्ये वारंवार भांडणे होत होती. गेल्या एक वर्षापासून आयेशा तिच्या मामाच्या घरी राहात होती. त्यांचा 12 वर्षांचा मुलगाही जाऊन त्यांच्यासोबत राहू लागला. आरोपी नीरज चावला देखील यामुळे चिडला होता. या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या फरीदाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयेशा आणि सुमन (आई आणि मुलगी) गुरुवारी रात्री जेवण करुन खालच्या खोलीत झोपायला गेल्या. आयशेचा भाऊ गगन आणि त्याचा मित्र राजन आणि 12 वर्षांचा पुतण्यासोबत वरच्या खोलीत झोपायला गेला.

मृत्यूचा तांडव स्वत:च्या डोळ्याने पाहिला –

गुरुवारच्या रात्री तीन वाजण्याच्या सुमारास (शुक्रवार 22 ऑक्टोबर 2021 च्या पहाटे) गगनला घरात गोळीबाराचा आवाज आला. गगनने पाहिले की त्याचा बहिणीचा पती नीरज चावला आणि त्याच्यासोबत आलेला मित्र लेखराज हे राजनला गोळ्या घालत होते. दोन्ही सशस्त्र हल्लेखोरांची नजर पडताच त्याने जीव वाचवण्यासाठी पळ काढला. त्याचवेळी हल्लेखोरांनी गगनला मागून कंबरेवर गोळी घातली. यानंतर नीरज चावला आणि त्याच्यासोबत आलेला दुसरा सशस्त्र हल्लेखोर लेखराज यांनी प्रथम आयेशा आणि तिची आई सुमन यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर दोघांनाही चाकूने भोकसले. फरिदाबाद पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सासरच्या घराच्या दारात पोहोचलेल्या नीरज चावलाने घरात झोपलेल्या आपल्या 12 वर्षांच्या मुलाला कॉल केला होता.

आपल्या मुलाशीही विश्वासघात केला –

नीरजने मुलाला सांगितले की तो घराच्या दारात उभा आहे. तो पत्नीला भेटायला आला आहे. जेव्हा मुलाने मध्यरात्रीनंतर पोहोचण्याचे कारण विचारले, तेव्हा दोन वाजता वडिलांनी प्रकरण पुढे ढकलले आणि मग मी तुला भेटून चालला जाईल. त्यामुळे वडिलांच्या मनात अगोदरच रचलेल्या रक्तरंजित कारस्थानाची कुठलीही माहिती नसलेल्या 12 वर्षांच्या मुलाने दरवाजा उघडून वडिलांना घरात बोलावले.

घरात प्रवेश करताच आरोपींनी प्रथम घराचा पहिला मजला गाठला. जिथे नीरज चावलाचा मेव्हणा गगन त्याचा मित्र राजन पुतण्यासोबत झोपला होता. तेथे राजन आणि गगन यांना मारेकऱ्यांनी प्रथम गोळ्या घातल्या. त्यानंतर दोघेही तळमजल्यावर पोहोचले. तळमजल्यावर नीरज आणि त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या हल्लेखोराने आयेशा आणि तिच्या आईवर गोळ्या झाडल्या. त्या निरागस मुलाने मृत्यूच्या तांडवाला आपल्या डोळ्याने बघितले.

संबंधित बातम्या :

ही तर सैतानाचा अवतार, नग्न करुन महिलेचा बळी देण्याचा प्रयत्न, रडण्याच्या आवाजाने शेजाऱ्यांचा थरकाप

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.