AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हादरवून सोडणारी घटना, कारमध्ये बसून एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या

प्रवीण मित्तल आपल्या कुटुंबासह पंचकूला येथे आयोजित बागेश्वर धामच्या हनुमंत कथा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेला. कार्यक्रम संपवून डेहराडूनला परतत असताना वाटेतच त्याने सामूहिक आत्महत्येच पाऊल उचललं. पंचकूला डीसीपी हिमाद्री कौशिक आणि डीसीपी लॉ एंड ऑर्डर अमित दहिया तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी एक सुसाइड नोटही सापडली आहे.

हादरवून सोडणारी घटना, कारमध्ये बसून एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या
Family Ends Life in Car
| Updated on: May 27, 2025 | 8:27 AM
Share

हरियाणाच्या पंचकूलामध्ये एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्येच टोकाचं पाऊल उचललं. कारमध्ये बसून विष प्राशन करुन या कुटुंबाने आपलं जीवन संपवलं. पोलिसांनी सात मृतदेह ताब्यात घेतले आहेत. आजोबा, आई-वडिल आणि मुलांचा मृत्यू झाला आहे. सर्व सातही मृतदेहांच पोस्टमार्टम करण्यात येईल, असं अधिकाऱ्याने सांगितलं. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. विष प्राशन करुन आत्महत्या करणारं हे कुटुंब उत्तराखंडच असल्याच सांगितलं जातय. पंचकूलामध्ये हे कुटुंब रहायचं. मृतांमध्ये एक जोडपं, त्यांची तीन मुलं आणि कुटुंबातील वृद्धांचा समावेश आहे. ज्या कारमध्ये हे सर्व मृतदेह मिळाले, त्या कारचा नंबर डेहराडूनचा आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केलाय.

हे कुटुंब उत्तराखंडच होतं. पंचकूला येथे 1204 घरासमोर कारमध्ये बसून या कुटुंबाने आयुष्य संपवलं. सोमवारी रात्री या घटनेबद्दल समजल्याच पोलिसांनी सांगितलं. रात्री 11 वाजता पोलिसांना एक फोन आला. कॉलरने सांगितलं की, एक कार पंचकूलाच्या सेक्टर-27 मध्ये उभी आहे. त्यात काही लोकांनी आत्महत्या केली आहे.

रुग्णालयात आणण्याआधीच सर्वांनी प्राण सोडले

माहिती मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. मृतदेह कारमधून काढून पंचकूलाच्या सेक्टर 26 येथील एका खासगी रुग्णालयातील शवागरात ठेवण्यात आले आहेत. सर्व मृतदेहांच पोस्टमार्टम होईल. कारमध्ये 7 जण होते. डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केलय. रुग्णालयात आणण्याआधीच सर्वांनी प्राण सोडले होते. मृतकांची ओळख पटली आहे. देशराज मित्तल आणि प्रवीण मित्तल अशी त्यांची नाव आहेत.

अख्ख्या कुटुंबानेच आत्महत्या का केली?

तपासात पोलिसांना समजलं की, प्रवीणने अलीकडेच डेहराडून येथे टूर अँड ट्रॅव्हलचा बिझनेस सुरु केला होता. त्याने बिझनेसमध्ये बराच पैसा टाकला होता. पण यश मिळालं नाही. बिझनेस लॉसमध्ये गेल्याने प्रवीण कर्जात बुडाला होता. कुटुंबाचा खर्च भागवणही दिवसेंदिवस त्याच्यासाठी कठीण झालं होतं. म्हणून संपूर्ण कुटुंबाने जीवन संपवलं.

Follow Us
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू