Himani Murder Case : भरपूर पैसा दिला, ब्लॅकमेलिंग…काँग्रेस कार्यकर्ता हिमानी हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

Himani Murder Case : रस्त्यावर एका सूटकेसमध्ये काँग्रेस कार्यकर्ता हिमानी नरवालचा मृतदेह सापडला. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिमानी नरवाल काँग्रेस पक्षाशी संबंधित होती. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत दिसल्याने हिमानी चर्चेत आलेली.

Himani Murder Case : भरपूर पैसा दिला, ब्लॅकमेलिंग...काँग्रेस कार्यकर्ता हिमानी हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
congress worker himani narwal case
| Updated on: Mar 03, 2025 | 1:17 PM

हरियाणाच्या रोहतकमधील काँग्रेस कार्यकर्ता हिमानी नरवाल हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. हिमानीची हत्या तिच्याच प्रियकराने केली. हत्येचा गुन्हा केल्यानंतर तो दिल्लीला फरार झाला. पोलिसांनी आरोपी प्रियकराला दिल्लीतून अटक केली. सुरुवातीच्या तपासात आरोपीने हत्येचा गुन्हा कबूल केलाय. त्याने हत्येच कारण सुद्धा सांगितलं. आरोपी बऱ्याच काळपासून हिमानीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच तपासातून समोर आलय. प्रारंभीच्या तपासात ब्लॅकमेलिंगचा प्रकार समोर आलाय. आरोपीने कबूल केलं की, त्याने हिमानीला भरपूर पैसे दिले होते. मात्र, तरीही ती सतत जास्त पैशांची मागणी करत होती. आरोपीच नाव सचिन असून तो सुद्धा रोहतकचाच राहणारा आहे.

रोहतक पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर 36 तासांनी आरोपीला अटक केली. आरोपीने हिमानीची हत्या तिच्याच घरात केली. हिमानी विजयनगर येथे भाड्याच्या घरात राहत होती. तिच्यासोबत तिची आई आणि भाऊ राहत होते. गुन्हा घडला त्या दिवशी ते दोघे नजफगढला गेले होते. हिमानी घरी एकटीच होती. मीडिया रिपोर्ट्नुसार आरोपी सचिनने हिमानीची तिच्याच घरात हत्या केली. तिचा मृतदेह एक सूटकेसमध्ये भरला आणि तिच्या घरापासून लांब 800 मीटर अंतरावर सांपला बस स्टँडच्या फ्लायओव्हरजवळ ती सूटकेस नेऊन ठेवली.

प्रेम प्रकरण समोर आलय

हिमानी नरवाल काँग्रेस पार्टीशी संबंधित होती. कायद्याचे शिक्षण ती घेत होती. हिमानी 2024 हरियाणा विधानसभा निवडणुकीत सक्रीय होती. हिमानीच्या नातेवाईकांनुसार तिच्या लग्नासाठी स्थळाचा शोध सुरु होता. प्राथमिक तपासात हिमानीच प्रेम प्रकरण समोर आलय. मारेकरी तिचा प्रियकरच आहे. पोलीस आज या सगळ्या घटनेचा खुलासा करतील.

भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत दिसलेली

हिमानी नरवालच्या हत्येनंतर काँग्रेसने तपासासाठी SIT स्थापन करण्याची मागणी केली होती. हिमानी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमांशिवाय सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमात सहभागी व्हायची. हिमानीची हत्या झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री दीपेन्द्र सिंह हुड्डा यांनी दु:ख व्यक्त केलं. त्यांनी राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. हिमानी नरवालची हत्या झाल्याच समजल्यानंतर एकच खळबळ उडाली. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत दिसल्याने हिमानी चर्चेत आलेली.