AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हायकाय नायकाय… लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी चुना लावला, होतं नव्हतं सर्व घेऊन नवरीचा पहाटेच पोबारा

घरात लग्नाचा माहोल, नव्या सुनेचा नुकताच गृहप्रेवश. लग्न नीट पार पडल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर समाधान होते. आजूबाजूचे लोकही नव्या सुनेला आशिर्वाद द्यायला आवर्जून येत होते. पण हसतंखेळतं घर अचानक शांत झालं. कोणाच्याही मनात धडकी भरावी असा सन्नाटा पसरला .

हायकाय नायकाय... लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी चुना लावला, होतं नव्हतं सर्व घेऊन नवरीचा पहाटेच पोबारा
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Nov 30, 2023 | 9:06 AM
Share

चंदीगड | 30 नोव्हेंबर 2023 : घरात लग्नाचा माहोल, नव्या सुनेचा नुकताच गृहप्रेवश. लग्न नीट पार पडल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर समाधान होते. आजूबाजूचे लोकही नव्या सुनेला आशिर्वाद द्यायला आवर्जून येत होते. पण हसतंखेळतं घर अचानक शांत झालं, असा सन्नाटा पसरला की कोणाच्याही मनात धडकी भरावी. लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच नव्या सुनेने केलेल्या प्रतापामुळे लग्नघरात शोककळा पसरली. हरियाणातील रेवाडी येथे ही दुर्दैवी घटना घडली.

तेथे एका लुटारू वधूचे प्रकरण समोर आले आहे. लग्नानंतर अवघ्या तीन दिवसात नववधू घरातून गायब झाल्याने एकच गोंधळ माजला. पण ती एकटीच गेली नाही, तर घरातील होतं नव्हतं ते सगळं मौल्यवान सामान, लाखो रुपयांचे दागिनेही घेऊन ती पळाली. तिचा हा प्रताप जवळच लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. याप्रकरणी पीडित कुटुंबियांनी अखेर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली.

धूमधडाक्यात झालं लग्न पण..

मिळालेल्या माहितीनुसार, बावल विधानसभेच्या टंकडी गावातील लक्ष्मीनारायण उर्फ ​​राजकुमार शर्मा यांचा विवाह उत्तर प्रदेशातील तरुणीशी झाला होता. एका मध्यस्थाच्या माध्यमातून हे लग्न ठरले होते. राजकुमारने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, घरच्यांनी मोठ्या थाटामाटात हे लग्न पार पाडले होते. वधूसोबत तिचा भाऊ आणि वहिनीही आले होते. संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते, आजूबाजूचे लोकही वधूला पाहण्यासाठी, तिला आशिर्वाद देण्यासाठी येत होते.

पहाटेच्या सुमारास भिंत ओलांडून नवी नवरी पसार

सगळं काही आनंदाच सुरू होतं, आलबेल होतं. पण लग्नाच्या तिसर्‍या दिवशी वधू गुपचूप पळून जाईल, हे कुटुंबातील कोणाच्या ध्यानीमनीही नव्हते. या घटनेनंतर संपूर्ण घराला धक्का बसला आहे. सासरच्यांनी वधूच्या कुटुंबीयांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यापैकी कोणीच, काहीही बोलायला तयार नाही.

लाखोंचे दागिनेही पळवले

नवी नवरी पळाल्याने गावात एकच चर्चा सुरू आहे. पण ती काही एकटी पळाली नाही तर तिच्यासोबत तिने घरातील मौल्यवान वस्तू, लाखो रुपयांचे दागिनेही पळवून नेले. या संपूर्ण प्रकरणामुळे घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. ज्या घरात दोन दिवसांपूर्वी शहनाईचे सूर गुंजत होते, तिथे आता शांतता पसरली आहे. यानंतर पीडित कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. यापोलिसांनी तपासासाठी पीडित कुटुंबाच्या घरी पोहोचून सीसीटीव्ही ताब्यात घेतला असून त्या फुटेजमधून काही सुगावा मिळतो का याचा पोलिस शोध घेत आहेत. पोलीस नववधूच्या शोधात व्यस्त आहेत मात्र तिने हे पाऊल का उचलले हे अद्याप कोणालाच समजलेले नाही. लुटारू वधूला लवकरात लवकर पकडण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी