AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नासाठी करत होता पैशांची जमवाजमव, 2 मंदिरं आणि 6 घरांमध्ये चोरी, अंबरनाथमध्ये अट्टल चोरटा गजाआड

अंबरनाथ पोलिसांनी चोरी आणि घरफोडीचे 29 गुन्हे दाखल असलेल्या शिकलकर गॅंगच्या एका अट्टल चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. मजेशीर बाब म्हणजे स्वतःच्या लग्नाला पैसे जमवण्यासाठी हा चोरटा चोऱ्या करत होता. अंबरनाथ शहरात 4 मार्चला एकाच रात्रीत 2 मंदिरं आणि 6 घरांमध्ये चोरी झाली होती. या चोरट्यांचा माग काढताना पोलिसांनी कनवर सिंग टाक याच्यासह एका 17 वर्षीय अल्पवयीन चोरट्याला भगतसिंग नगरमधून बेड्या ठोकल्या होत्या

लग्नासाठी करत होता पैशांची जमवाजमव,  2 मंदिरं आणि 6 घरांमध्ये चोरी, अंबरनाथमध्ये अट्टल चोरटा गजाआड
वार्ड प्रमुखाला अनेक महिने ओलीस ठेवल्याचा आमदारावर आरोप.Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 10, 2022 | 6:58 AM
Share

अंबरनाथ: अंबरनाथ (Ambarnath) पोलिसांनी चोरी आणि घरफोडीचे 29 गुन्हे दाखल असलेल्या शिकलकर गॅंगच्या एका अट्टल चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. मजेशीर बाब म्हणजे स्वतःच्या लग्नाला पैसे जमवण्यासाठी हा चोरटा चोऱ्या करत होता. अंबरनाथ शहरात 4 मार्चला एकाच रात्रीत 2 मंदिरं आणि 6 घरांमध्ये चोरी झाली होती. या चोरट्यांचा माग काढताना पोलिसांनी (Police) कनवर सिंग टाक याच्यासह एका 17 वर्षीय अल्पवयीन चोरट्याला भगतसिंग नगरमधून बेड्या ठोकल्या होत्या. त्यांच्या चौकशीत त्याने चोरीच्या या आठही गुन्ह्यांची कबूली दिली. तसंच आपण उल्हासनगरातून (Ulhasnagar) दोन दुचाकी चोरल्याचीही माहिती त्याने यावेळी पोलिसांना दिली.

लग्नासाठी करत होता पैशांची जमवाजमव

कनवर सिंग टाक हा शिकलकर टोळीचा सदस्य असून मूळचा पुण्याच्या हडपसर भागात राहणारा आहे. त्याच्यावर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चोरी आणि घरफोडीचे तब्बल 29 गुन्हे दाखल आहेत. मजेशीर बाब म्हणजे त्याने या चोऱ्या आपल्या लग्नाचा खर्च जमवण्यासाठी केल्याचं पोलिसांना सांगित आहे. 4 तारखेला तो पुण्याहून अंबरनाथला आला आणि भगतसिंग नगर भागात राहणाऱ्या मामाच्या मुलासोबत मिळून चोऱ्या केल्याची कबूली त्याने यावेळी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला 6 तारखेला 8 मार्चला अटक केली आहे. त्याच्याकडून मंदिरातून चोरलेला मुद्देमाल, दोन चोरीच्या दुचाकी आणि चोरीसाठी वापरलेली अवजारे जप्त करण्यात आली आहेत. न्यायालयाने त्याला 11 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.

तब्बल 29 गुन्हे

अंबरनाथमधील लग्नासाठी पैशांची जमवाजमव करणाऱ्या कनवर सिंग टाक या चोरट्यावर आतापर्यंत तब्बल 29 गुन्हे  दाखल आहेत. मजेशीर बाब म्हणजे त्या चोरट्याने या चोऱ्या आपल्या लग्नाचा खर्च जमवण्यासाठी केल्याचं कबुली पोलिसांना दिली आहे. या चोरट्यांचा माग काढताना पोलिसांनी (Police) कनवर सिंग टाक याच्यासह एका 17 वर्षीय अल्पवयीन चोरट्याला भगतसिंग नगरमधून बेड्या ठोकल्या होत्या आहेत. चौकशीत या चोरट्याने केलेल्या आठही गुन्ह्यांची कबुली दिली आहे. लग्नासाठी पैशांची जमवाजमव करणाऱ्या या चोरट्याला न्यायालयाने 11 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

इतर बातम्या

Video | बाटलीत डिझेल दिले नाही म्हणून पेट्रोलपंप कर्मचाऱ्याला मारहाण; पेव्हर ब्लॉक डोक्यात घातला

Goa Election Result | गोव्यात कुणाची सत्ता? भाजप-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, निकाल काही तासांत येणार!

Auranagabad | ऐतिहासिक आदिल दरवाजा उजळणार, नूतनीकरण सुरु, दिवसा आणि रात्री कसे असेल चित्र?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.