Goa Election Result | गोव्यात कुणाची सत्ता? भाजप-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, निकाल काही तासांत येणार!

गोव्याची सत्ता टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर आहे. त्यातच दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी बंड केलं. या सर्वातून सावरत भाजप गोव्याची सत्ता शाबूत ठेवणार का, या प्रश्नाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचं उत्तर येत्या काही तासातच मिळेल.

Goa Election Result | गोव्यात कुणाची सत्ता? भाजप-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, निकाल काही तासांत येणार!
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 8:18 AM

पणजीः देशातील अत्यंत महत्त्वाच्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल (Goa Assembly Elections) येत्या काही तासांत हाती येणार आहेत. एकिकडे सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आहे तर दुसरीकडे गोव्यासारखे लहानसे राज्य. विधानसभेच्या केवळ 40 जागा असल्या तरीही इथलं राजकारण मात्र प्रचंड गुंतागुंतीचं आहे. गेल्या तीन दशकांपासून भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षातच येथील विधानसभेची प्रतिष्ठेची लढाई होत आली आहे. 2017 मध्ये जागा कमी मिळूनही भाजपने सत्ता स्थापन केली. मात्र त्यानंतर भाजपसमोर बंडखोरांचं आव्हान पेलत निवडणुकीत प्रचंड ताकद लावली आहे. काँग्रेसनेही त्याच ताकतीनं दंड थोपटले आहेत. एवढंच नाही तर महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही पक्ष विस्तारासाठी निवडणुकीत आपलं बळ आजमावलं आहे. त्यामुळे सत्ता टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर उभं ठाकलं. त्यातच दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी बंड केलं. या सर्वातून सावरत भाजप गोव्याची सत्ता शाबूत ठेवणार का, या प्रश्नाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचं उत्तर येत्या काही तासातच मिळेल.

कोणत्या पक्षाचे किती उमेदवार?

गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी यंदा 301 उमेदवारांनी भवितव्य आजमावलं आहे. एकूण 17 राजकीय पक्ष या निवडणुकीत भवितव्य आजमावत असून यात प्रामुख्याने भाजप आणि आपने सर्वाधिक जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भाजप-40 काँग्रेस- गोवा फॉरवर्ड- 37+3 आप-39 राष्ट्रवादी- शिवसेना- 13+10 गोवा तृणमूल- मगोप- 26+13 रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी- 38, गोंयचो स्वाभिमान पार्टी- 4

प्रमुख पाच लढती कोणत्या?

पणजी- भाजपचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर अपक्ष म्हणून लढत आहेत. भाजपकडून बाबूश मॉन्सेराज यांचे त्यांना आव्हान असेल. मांद्रे- भाजपचे वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर अपक्ष म्हणून उभे ठाकले आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने दयानंद सोपटे यांना उमेदवारी दिली आहे. मडगाव- माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा मतदार संघ. काँग्रेसचे कदाचित मुख्यमंत्री पदाचे उमेदवार. त्यांच्याविरोधात भाजपचे मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर आहेत. प्रियोळ- काँग्रेसचे दीपक ढवळीकर यांच्याविरोधात भाजपचे गोविंद गावडे. पर्ये- राणेविरुद्ध राणे संघर्ष. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र त्यांचे पुत्रच भाजपात गेल्याने स्नुषा विरोधात उभी ठाकली. अखेर काँग्रेसचे रणजित राणे विरुद्ध दिव्या राणे असा संघर्ष आहे.

एक्झिट पोल काय सांगतात?

टीव्ही 9 भारतवर्षने केलेल्या एक्झिट पोलनुसार, गोव्यात कोणत्याही एक पक्षाला बहुमत मिळणार नाही, अशी शक्यता आहे. मात्र भाजपला सर्वाधिक जागा मिळतील. तसेच इतर पक्षांमध्ये काँग्रेस दुसऱ्या तर आप तिसऱ्या क्रमांकावर असेल, असा अंदाज आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, गोव्यातील एकूण 40 जागांपैकी भाजपाला 17 ते 19 जागा मिळतील. काँग्रेस आणि मित्रपक्षांना 11 ते 13 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच आपदेखील विधानसभेत खाते उघडेल आणि पक्षाला चार जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मागील विधानसभेचे चित्र काय?

गोव्यात मार्च 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 40 पैकी सर्वाधिक 17 जागा जिंकल्या होत्या. भाजपने या निवडणुकीत 13 जागांवर विजय मिळवला. मात्र 2 अपक्ष आमदारांनी तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पार्टी या दोन पक्षांच्या प्रत्येकी 3 आमदारांनी भाजपला पाठींबा दिला. त्यांच्या अटीनुसार, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पुन्हा गोव्याच्या राजकारणात येत मुख्यमंत्री पद स्वीकारले. त्यानुसार मनोहर पर्रीकर यांनी पुन्हा 14 मार्च 2017 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा जिंकूनही त्यांच्या पदरी निराशा आली होती. 2017 मधील निकाल असा- भाजप – 13 काँग्रेस – 17 राष्ट्रवादी काँग्रेस -1 महाराष्ट्रवादी गोमंतक – 3 गोवा फॉरवर्ड पार्टी – 3 अपक्ष/इतर – 3

40 जागांसाठी 75% मतदान

गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत 75.29 टक्के मतदान झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याने सर्वच पक्षांना निकालाची चिंता लागली आहे.

मुख्यमंत्रीपदाचे चेहरे कोण?

सध्या गोव्याचे मुख्यमंत्री असलेले प्रमोद सावंत यांनी निवडणुकीत भाजपलाच बहुमत मिळेल, असा दावा केला आहे. एकूण राजकीय वर्तुळातील चर्चा पाहता भाजपच्या वतीने प्रमोद सावंत, काँग्रेसचे दिगंबर कामत, तृणमूल काँग्रेसचे चर्चिल आलेमाओ, भाजपचे रवी नाईक, अपक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर, मगोपचे सुदिन ढवळीकर, अपक्ष उत्पल पर्रीकर, आपचे अमित पालेकर हे दिग्गज नेते रिंगणात उतरले आहेत. या प्रमुख चेहऱ्यांपैकीच एक चेहरा गोव्याचा भावी मुख्यमंत्री बनू शकतो, अशी चर्चा आहे.

मतमोजणीची जय्यत तयारी

गोवा विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार, याचा निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे. खरं तर मतमोजणीसाठी सकाळी 8 ते दुपारी 4 अशी वेळ देण्यात आली आहे. मात्र सकाळी अकरा वाजेपर्यंतच निकाल बाहेर येतील, असे नियोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणी विविध फेऱ्यांमध्ये होणार असून कमीत कमी सहा फेऱ्या तर जास्तीत जास्त 11 फेऱ्या होतील. मतमोजणी केंद्रात मोबाइलवर बंदी घालण्यात आली आहे. केवळ निवडणूक अधिकार्यालाच मोबाइलची परवानगी आहे. मतमोजणी केंद्राला कडेकोट सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. केंद्रात जाणाऱ्याला तीन ठिकाणी सुरक्षा तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. या परिसरात गोवा पोलीस आणि सशस्त्र पोलीसही तैनात केले आहेत.

इतर बातम्या

Pimpari BJP Corporater Resigne | Pimpri Chinchwadमध्ये भाजपाची गळती सुरूच

Dhoni-Sakshi: साक्षी धोनीने सांगितले एमएस धोनीची पत्नी असण्याचे साइड-इफेक्टस

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.