AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime : काय म्हणायचं या नराधमाला? जिच्या वर बलात्कार केल्याप्रकरणी जेलमध्ये गेला बाहेर आल्यावर पुन्हा तिच्यावरच सामूहिक बलात्कार केला आणि…

एका बलात्कार प्रकरणातील आरोपीने जेलमधून बाहेर आल्यावर पुन्हा त्याच पीडित तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आहे. मध्य प्रदेशात ही माणुसकीला काळीमा फासणारी अशी धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने या तरुणीवर सामूहिक बलात्कार करून त्याचा व्हिडिओ देखील बनवला आहे.

Crime : काय म्हणायचं या नराधमाला? जिच्या वर बलात्कार केल्याप्रकरणी जेलमध्ये गेला बाहेर आल्यावर पुन्हा तिच्यावरच सामूहिक बलात्कार केला आणि...
प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला
| Updated on: Aug 03, 2022 | 7:15 PM
Share

जबलपूर : वाढते बलात्कार रोखण्यासाठी आरोपींना तात्काळ शिक्षा दिली जाते. या प्रकरणाचे खटले फास्टट्रॅक कोर्टात देखील चालवले जातात. मात्र, एका बलात्कार प्रकरणातील आरोपीने जेलमधून बाहेर आल्यावर पुन्हा त्याच पीडित तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आहे. मध्य प्रदेशात(Madhya Pradesh) ही माणुसकीला काळीमा फासणारी अशी धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने या तरुणीवर सामूहिक बलात्कार(Gang-rape) करून त्याचा व्हिडिओ देखील बनवला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पीडित तरुणीने आरोपी विरोधात पोलिसात तक्रार केली आहे.

मध्य प्रदेशातील जबलपूरमधून ही धक्कादायक घटना घडलेय. एका आरोपीने पीडितेवर बलात्कार केला होता. या प्रकरणी आरोपी एक वर्ष कारागृहात होता. मात्र, त्याची जामीनावर सुटका झाली आणि तो जेलमधून बाहेर आला. यानंतर तो या प्रकरणाचा खटला मागे घेण्यासाठी पीडितेवर सतत दबाव टाकत होता. जेव्हा पीडितेने खटला मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला तेव्हा आरोपीने त्याच्या मित्रांसह चाकूचा धाक दाखवत पीडितेवर पुन्हा एकदा सामूहिक बलात्कार केला.

एवढेच नाही तर आरोपीने गँग रेप करतानाचा व्हिडिओही देखील बनवला. आता तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत नराधम पीडितेवर केस मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहे. याबाबत बलात्कार पीडितेने पुन्हा तक्रार केली असून, त्याआधारे पोलिसांनी पुन्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

जबलपूरच्या पाटण पोलीस स्टेशन परिसरातील हे प्रकरण आहे. आरोपीने मित्रासह पीडितेच्या घरातच तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

बलात्काराच्या आरोपाखाली वर्षभर जेलमध्ये होता

आरोपी हा बलात्काराच्या आरोपाखाली वर्षभर जेलमध्ये होता. मात्र, जेलमधून बाहेर येताच त्याने पुन्हा तोच गुन्हा केला आहे. विवेक पटेल असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने 2019 मध्ये तिच्यावर बलात्कार केला होता. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि विवेकला तुरुंगात जावे लागले. काही महिन्यांपूर्वी विवेक तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने पीडितेवर खटला मागे घेण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आणि तिला धमक्या दिल्या. पीडितेने केस मागे न घेतल्याने आरोपीने त्याच्या मित्रासह तिच्या घरी जाऊन तिला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला.

आरोपींना कसले भयच राहिले नाही

आरोपींना कसले भयच राहिले नसल्याचे या घटनेवरुन दिसत आहे. आरोपीला ना कायद्याचा धाक आहे, ना त्याच्या मनात अपराधीपणाची भावना आहे, हे या घटनेवरून स्पष्ट होते. सध्या पोलीस आरोपी विवेक पटेल आणि त्याच्या मित्राचा शोध घेत आहेत. त्यासाठी अनेक पथके आरोपींच्या संबंधित ठिकाणी छापे टाकत आहेत. मात्र अद्यापपर्यंत आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.