AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर होत नव्हतं मूल, कोरोनामध्ये पतीही गेला, अन् आता झाली आई….

Viral News : कोरोनामध्ये पती गेल्यावर महिलेने एका बाळाला जन्म दिल्याने याची सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे. संबंधित महिलेने दुसरं लग्न केलं ना तिचं कोणाशी अफेर होतं, तरीसुद्ध तिने बाळाला जन्म दिल्याने चर्चांणा उधाण आलं आहे.

लग्नानंतर होत नव्हतं मूल, कोरोनामध्ये पतीही गेला, अन् आता झाली आई....
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 21, 2023 | 6:13 PM
Share

Crime News : कोरोना महामारीमध्ये अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. कुटूंबच्या कुटूंब महामारीमध्ये संपलीत. काहींना तर मृत्यू झालेल्या आपल्या माणसांची राखही मिळाली नाही. अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरानामध्ये दोन वर्षापूर्वी पतीच्या झालेल्या मृत्यूनंतर महिला आता गरोदर राहिल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. नेमकं काय प्रकरण जाणून घ्या.

काय आहे प्रकरण?

संगीता असं गरोदर राहिलेल्या महिलेचं नाव होतं. तिचं अरूण प्रसाद या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. उशिरा लग्न झाल्यामुळे त्यांना मूल राहत नव्हतं. या काळात त्यांनी अनेक उपचार घेतले मात्र संगीता गरोदर राहिल्या नाहीत. कोरोनामध्ये अरूण यांचं निधन झाल्याने ती खचून गेली. मात्र संगीता यांची आई होण्याची इच्छा अपूर्ण राहिली होती. पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा येथील नैहाटीमध्ये संगीता राहत आहेत.

आई होण्याची इच्छा असलेल्या संगीताने तिची इच्छा डॉक्टरांना सांगितली. संगीताच्या आई होण्याच्या निर्णयाला सासरचे किंवा सासरच्या मंडळींनी सहमती दर्शवली नाही. पतीच्या निधनानंतर संगीता आई-वडील आणि सासरच्यांसोबत राहत नाही. घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय संगीताने आई होण्याची इच्छा कधीच मरू दिली नाही. संगीताने पश्चिम बंगालमधील रामपूरहाट मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) चा वापर केला आणि संगीता यांनी बाळाला जन्म दिला.

दरम्यान, संगीता यांनी मृत्यूपूर्वी तिच्या पतीचे शुक्राणू कोलकाता येथील प्रयोगशाळेत ठेवले होते. नवीन  तंत्रज्ञानाचा उपयोग करत संगीता आई बनली. संगीता यांचं आता वय 48 वर्षे इतकं आहे. पती कोरोनामध्ये गेल्यावरही बाळाला जन्म दिल्याने सर्वत्र चर्चा होत आहेत.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच