नोएड्यातील पोलीस ठाण्यात अजब तक्रार दाखल, पतीच्या सांगण्यावरुन पत्नीविरोधात हनीट्रॅपचा गुन्हा

| Updated on: Nov 15, 2021 | 8:14 PM

गौतम बुद्ध नगरमधील डीसीपी महिला सुरक्षा वृंदा शुक्ला यांनीही या प्रकरणाची पुष्टी करताना सांगितले की, सेक्टर 41 मध्ये राहणारे दीपक कुमार यांनी अशी तक्रार दाखल केली आहे. एका डेटिंग अॅपवर तरुण या महिलेला भेटल्याचेही अहवालात उघड झाले आहे. महिलेने अॅपवर नोंदणी करताना सिंगल असल्याचे लिहिले होते.

नोएड्यातील पोलीस ठाण्यात अजब तक्रार दाखल, पतीच्या सांगण्यावरुन पत्नीविरोधात हनीट्रॅपचा गुन्हा
नोएड्यातील पोलीस ठाण्यात अजब तक्रार दाखल
Follow us on

नवी दिल्ली : नोएडातील एका पोलीस ठाण्यात एक विचित्र तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका तरुणाने पोलीस ठाण्यात येऊन पत्नीविरोधात हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल केला आहे. आपली पत्नी भोळ्या लोकांना हनी-ट्रॅपमध्ये अडकवते आणि ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळते. एवढेच नाही तर तिने आतापर्यंत अनेकांना हनीट्रॅपचा शिकार बनवले आहे, असे सदर तरुणाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नीविरुद्ध सेक्टर 49 पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

परस्पर संमतीने लैंगिक संबंध

गौतम बुद्ध नगरमधील डीसीपी महिला सुरक्षा वृंदा शुक्ला यांनीही या प्रकरणाची पुष्टी करताना सांगितले की, सेक्टर 41 मध्ये राहणारे दीपक कुमार यांनी अशी तक्रार दाखल केली आहे. एका डेटिंग अॅपवर तरुण या महिलेला भेटल्याचेही अहवालात उघड झाले आहे. महिलेने अॅपवर नोंदणी करताना सिंगल असल्याचे लिहिले होते. दोघांमध्ये बोलणे सुरु झाले आणि त्यानंतर महिलेने त्याला ओखला येथे भेटायला बोलावले. तेथे दोघांच्या परस्पर संमतीने शारीरिक संबंध निर्माण झाले.

आरोप करताना दीपकने असेही सांगितले की, त्यानंतर त्याला ब्लॅकमेल केले जाऊ लागले. एवढेच नाही तर त्याच्याकडून मोठ्या रकमेची मागणीही करण्यात आली होती. पैसे न दिल्यास दीपकला बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात जाण्याची धमकी देण्यात आली, त्यानंतर दीपकने दबावाखाली येऊन महिलेशी लग्न केले. जेव्हा दीपकने चौकशी केली तेव्हा त्याला कळले की सदर महिला आधीच विवाहित आहे. परंतु सोशल मीडियावर ती स्वतःला अविवाहित असल्याचे सांगते.

लग्नानंतरही ब्लॅकमेलिंग करते

महिला लग्नानंतरही अशाप्रकारे ब्लॅकमेलिंग करत असून डेटिंग अॅप्सच्या माध्यमातून मुलांशी मैत्री करते. नंतर त्यांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवत असल्याचा आरोपही एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन मोठी रक्कम वसुल करते. (Honeytrap case against wife over husband’s statement at Noida police station)

इतर बातम्या

Jharkhand Crime : पलामूमध्ये भाजपच्या युवा नेत्याची गोळी झाडून हत्या, हरिहरगंज बाजार बंद

धक्कादायक : मध्य प्रदेशात अमेझॉनवरुन 1 टन गांजाची तस्करी; ऑनलाईन अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश