AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jharkhand Crime : पलामूमध्ये भाजपच्या युवा नेत्याची गोळी झाडून हत्या, हरिहरगंज बाजार बंद

सुमित कुमार श्रीवास्तव असं हत्या करण्यात आलेल्या भाजप नेत्याचं नाव आहे. ते पलामू जिल्हा कोषाध्यक्ष होते. सुमित श्रीवास्तवच्या मागेवर धारधार शस्त्रानं वार करण्यात आले आहेत. श्रीवास्तव यांचा मृतदेह एनएच - 98 मेदिनीनगर-औरंगाबाद मुख्य महामार्गावर हरिहरगंज ठाणे क्षेत्रातील सार्वजनिक आरोग्य केंद्रानजिक पहाडी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर कारमधून ताब्यात घेण्यात आलं.

Jharkhand Crime : पलामूमध्ये भाजपच्या युवा नेत्याची गोळी झाडून हत्या, हरिहरगंज बाजार बंद
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 7:52 PM
Share

नवी दिल्ली : झारखंडमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या एका नेत्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. सुमित कुमार श्रीवास्तव असं हत्या करण्यात आलेल्या भाजप नेत्याचं नाव आहे. ते पलामू जिल्हा कोषाध्यक्ष होते. सुमित श्रीवास्तवच्या मागेवर धारधार शस्त्रानं वार करण्यात आले आहेत. श्रीवास्तव यांचा मृतदेह एनएच – 98 मेदिनीनगर-औरंगाबाद मुख्य महामार्गावर हरिहरगंज ठाणे क्षेत्रातील सार्वजनिक आरोग्य केंद्रानजिक पहाडी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर कारमधून ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. (BJP youth front leader Sumit Kumar Srivastava shot dead in Palamu, Jharkhand)

हत्येच्या या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. तर श्रीवास्तव यांच्या कुटुंबिय धक्क्यात आहेत. परिसरात दहशतीचं वातावरण आहे. पोलिसांनी तपास सुरु केलाय. मिळालेल्या माहितीनुसार सुमित कुमार काल रात्री आपल्या मित्रांकडे जात असल्याचं सांगत घरातून निघाले होते. मात्र, वापस आलेच नाहीत. त्यानंतर कुटुंबियांकडून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरु करण्यात आलं. मोठी शोधमोहिम राबवल्यानंतर एनएच-98 जवळ त्यांचा मृतदेह सापडला.

भाजप नेत्यांचा झारखंड सरकारला इशारा

झारखंड भाजपचे अध्यक्ष दीपक प्रकाश यांनी ट्विट केलं आहे की, पक्षाचे युवा मोर्चाचे पलामू जिल्हा कोषाध्यक्ष सुमित श्रीवास्तव यांच्या हत्येची निंदा करुन तेवढी कमी आहे. झारखंडमध्ये गुन्हेगारीचं तांडव सुरु आहे आणि राज्य सरकार फक्त अवैध वसूलीत गुंतलं आहे. राज्य सरकारने तातडीने आरोपींना अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जा, असा इशारा दीपक प्रकाश यांनी यांनी झारखंड सरकारला दिलाय. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय आनंद यांनी कायदा आणि सुव्यवस्थेला जबाबदार धरलंय. तसंच आरोपींना अटक केली नाही तर भाजप तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सुमित कुमार हा भाजपचा सच्चा शिपाई होता, असं म्हटलंय.

सुमितची हत्या करुन कारमध्ये मृतदेह ठेवला

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सुमित कुमार यांची हत्या करुन मृतदेह कारमध्ये ठेवला. ड्रायव्हर सीटच्या बाजूला मृतदेह अशाप्रकारे ठेवला होता की ज्याद्वारे रक्तप्रवाह होणार नाही. मॉर्निंग वॉकलावरुन परतणाऱ्या लोकांनी सांगितलं की ते जात असताना घटनास्थळावर कोणतीही कार उभी नव्हती. मात्र, परताना तिथे कार आणि त्यात एक मृतदेह होता. त्यावरुन सुमित कुमारची हत्या करुन आरोपी पसार झाल्याचं स्पष्ट होतं.

पलामू एसपी चंदन कुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री उशीरा सुमित कुमार आपल्या मित्रांना फोन करुनच घराबाहेर पडला होता. हरिहरगंज बाजारमध्ये काही युवकांमध्ये आपसांत वाद झाला होता. या मारामारीत सहभागी असलेल्या एका मित्राचं सुमित कुमारसोबत फोनवर चर्चा झाली होती. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे सुमितचे मित्रांवर संशय व्यक्त केला जातोय. एसपींनी सांगितलं की लवकरच तपास करुन आरोपींना अटक केली जाईल.

इतर बातम्या :

VIDEO: सलमान खुर्शीद यांच्या घरावर दगडफेक, जाळपोळ; पुस्तकात हिंदुत्वाची ISIS आणि बोको हरामशी तुलना केल्याचा वादावरून झाला हल्ला

आनंदराव अडसूळांचा तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला, अडचणी वाढणार?

BJP youth front leader Sumit Kumar Srivastava shot dead in Palamu, Jharkhand

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.