ग्राहकांसोबत क्षुल्लक वाद, 18 वर्षीय वेटरची गोळी झाडून हत्या

सोमवारी संध्याकाळी दोघे बाईकस्वार रेस्टॉरंटमध्ये आले होते. चिली पोटॅटो आणि मोमोजची ऑर्डर त्यांनी दिली. ऑर्डरसाठी ते काऊंटरजवळ वाट बघत थांबले असताना वेटर अमनही तिथेच होता. तिघांची आपसात काहीतरी वादावादी झाली, त्यानंतर एकाने त्याच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे.

ग्राहकांसोबत क्षुल्लक वाद, 18 वर्षीय वेटरची गोळी झाडून हत्या
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 10:54 AM

नवी दिल्ली : रेस्टॉरंटमध्ये वेटरची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीत उघडकीस आली आहे. पार्सल नेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी वाद झाल्यानंतर वेटरवर गोळीबार केल्याचा आरोप आहे. गोळीबारात 18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

दिल्लीतील छावला भागात ही घटना घडल्याची माहिती आहे. खैरा रोडवरील हेव्हन एन रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला. सोमवारी संध्याकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास पोलिसांना यासंबंधी फोन आला होता. विकास यादवच्या मालकीच्या या रेस्टॉरंटमध्ये महेश नावाचा 19 वर्षीय तरुण वेटरचं काम करत होता. 23 ऑगस्टला तो एका दिवसाच्या सुट्टीवर होता. त्यामुळे यादव यांनी 18 वर्षीय अमन उर्फ गुलाम साबिर याला कामावर बोलावलं होतं.

क्षुल्लक वादातून गोळीबार

सोमवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास दोघे बाईकस्वार रेस्टॉरंटला आले होते. चिली पोटॅटो आणि मोमोजची ऑर्डर दिली. ऑर्डरसाठी ते काऊंटरजवळ थांबले असताना अमनही तिथेच होता. तिघांची आपसात काहीतरी वादावादी झाली. त्यानंतर दोघांपैकी एकाने अमनला गोळी मारली आणि दोघं पसार झाले.

सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु 

उपस्थित लोकांनी अमनला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. हत्येचं नेमकं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासून आरोपींचा शोध सुरु केला आहे.

पुण्यात बिर्याणी हॉटेल मालकावर कोयत्याने वार

दुसरीकडे, पुण्यातील गारवा बिर्याणी हॉटेलमध्ये हॉटेल मालकावर कोयत्याने वार केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. दोघे जण बिर्याणी घेण्यासाठी आले होते. त्यांच्याबरोबर मालकाची शाब्दिक आणि किरकोळ बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात धरुन दोघांनी त्यांच्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. त्या दोघांनी आणि त्यांच्या साथीदारांनी हॉटेलमध्ये घुसून कोयत्यासारख्या धारदार हत्याराने त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केला. तेव्हा हॉटेल मालकाच्या शेजारी उभा असलेल्या कामगार इसराफिल हा मध्ये आल्याने तो वार त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर बसून तो गंभीर जखमी झाला.

संबंधित बातम्या :

पुण्यात बिर्याणी हॉटेल मालकावर कोयत्याने वार, वादानंतर ग्राहकाचा मित्रांना बोलावून हल्ला

VIDEO | मुंबईत भाजी विक्रेत्याला मारहाण CCTV मध्ये कैद, तिघांना बेड्या

Non Stop LIVE Update
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.