AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदराव अडसूळांचा तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला, अडचणी वाढणार?

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश एस. एच. सातभाई यांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. ईडीने आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ईडीने अनेकवेळा धाडी टाकल्या आहेत.

आनंदराव अडसूळांचा तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला, अडचणी वाढणार?
आनंदराव अडसूळ, शिवसेना नेते
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 4:43 PM
Share

मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावलाय. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश एस. एच. सातभाई यांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. ईडीने आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ईडीने अनेकवेळा धाडी टाकल्या आहेत. (Special court rejects Anandrao Adsul’s bail application)

आनंदराव अडसूळ यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर अडसूळ यांनी ईडीची कारवाई टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी उच्च न्यायालयाने त्यांना कोणतीही सवलत न देता मुंबई सत्र न्यायालयात दाद मागण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अडसूळ यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यात अटकपूर्व जामीन अर्जावर जोवर सुनावणी पूर्ण होत नाही तोवर तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा, असा अर्ज केला होता. त्या अर्जावर आज कोर्टाने निर्णय दिला.

कोर्टाने अडसूळ यांचा तात्पुरता जामीन अर्ज फेटाळला आहे. मात्र, कायमस्वरुपी अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज सुनावणीसाठी कायम ठेवला आहे. त्यावर 25 नोव्हेंबर रोजी सुनावणी होईल. या अर्जावर ईडीला तात्काळ उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ईडीची धाड कशासाठी?

आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी बँकेत 900 कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी 27 सप्टेंबरला त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. 27 तारखेला सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर काही तास त्यांची चौकशी करण्यात आली. अखेर पावणे अकराच्या सुमारास ईडीने त्यांना ताब्यात घेतलं.

आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करणार आहे. आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.

इतर बातम्या :

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकललं जाण्याची शक्यता, कारण काय?

विक्रम गोखले म्हणाले, कंगना खरंच बोलली; शरद पवारांनी लावला गोखलेंच्या विधानाचा एका वाक्यात निक्काल

Special court rejects Anandrao Adsul’s bail application

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.