AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बदलापूरची’ पुनरावृत्ती, कर्जतमध्ये पाच वर्षांच्या चिमुरड्यांवर क्लिनरचा अत्याचार

धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या मुली सीटवर बसायला गेल्या नाही, तर आरोपी त्यांना मारहाण सुद्धा करायचा. विशेषस म्हणजे हा सर्व प्रकार गेल्या वर्षभरापासून पीडित मुलींसोबत सुरू होता, अशी माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

'बदलापूरची' पुनरावृत्ती, कर्जतमध्ये पाच वर्षांच्या चिमुरड्यांवर क्लिनरचा अत्याचार
प्रातिनिधक फोटो
| Updated on: Apr 17, 2025 | 11:07 AM
Share

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बदलापूरमधील शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने शाळेतल्या चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याचं प्रकरण उघडकीस आल्यावर प्रचंड गदारोळ माजला होता. राज्यात महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच आता कर्जतमध्येही अशाच नृशंस, हादरवणाऱ्या प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे. कर्जत तालुक्यात बदलापूर सारखी घटना घडली असून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर स्कूल बसमधल्याच क्लिनरने अत्याचार केला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या पीडित मुली अवघ्या 5 वर्षांच्या आहेत. यामुळे संतापाचे वातावरण आहे.

कर्जत तालुक्यातून त्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या स्कूल बसमधील ही घटना उघडकीस येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. ‘शाळा व शाळेची बस खरंच सुरक्षित आहे का?’ हा गंभीर प्रश्न अनेकांच्या मनात आहे. पोलिसांनी आरोपी क्लीनरला अटक केली असून त्याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण दीपक पाटील ( वय 24) असे आरोपीचे नाव असून तो कर्जत तालुक्यातील वदप येथील राहणारा आहे.

आरोपीकडून चिमुकल्यांना मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, त्या पिडीत मुलींनी आपल्या घरी पालकांना ही माहिती दिली आणि नंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपी करण हा त्यांना बसमधल्या ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर येऊन बसायला सांगायचा आणि त्यांना मांडीवर बसवून त्यांच्या शरीराच्या खाजगी भागांना अश्लीलरीत्या स्पर्श करायचा. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या मुली सीटवर बसायला गेल्या नाही, तर आरोपी त्यांना मारहाण सुद्धा करायचा. विशेषस म्हणजे हा सर्व प्रकार गेल्या वर्षभरापासून पीडित मुलींसोबत होत होता, अशी माहिती पालकांनी दिली आहे.

आपल्या मुलींचा लैंगिक छळ केला जदात असल्याचे उघड झाल्यावर संतप्त पालकांनी थेट कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी पीडितांच्या पालकांवर दबाव टाकण्यात आला असा आरोपही मुलीच्या आईनं केला आहे. त्यामुळे संताप अधिक वाढला आहे.

याप्रकरणात स्कूलबस मालकाची सुद्धा चौकशी व्हावी, अशी मागणी पालक करत आहेत. तसेच या प्रकरणातील आरोपी करण पाटील यांच्यासह ज्यांचा ज्यांचा या प्रकरणाशी संबध असेल त्यांनाही कठोरारात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडितांच्या नातेवाईकांनी केली आहे. “अशा नराधमांना कठोर शिक्षा द्या!”, अशी मागणी आता पालक वर्गातून जोर धरू लागली आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.