मुलाला चांगले मार्क देऊ, आम्हाला खुश कर… आमिष दाखवत शिक्षकांचा विद्यार्थ्याच्या आईवर अत्याचार
मलकापूर येथील दोन शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या आईवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षकांनी चांगले गुण देण्याचे आमिष दाखवून पीडित महिलेवर अनेकदा अत्याचार केला. पोलिसांनी दोन्ही शिक्षकांना अटक केली असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

शिक्षकाला देवाप्रमाणे मानलं जातं. आपल्या पाल्याने चांगलं शिकून मोठं व्हावं अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते, त्यासाठी ते शिक्षकांकडेच आदर्श म्हणून पहात असतात. पण याच शिक्षकी पेशाला काळिमा फासणारं, एक भयानक कृत्य बुलढाण्यातील मलकापूरमध्ये घडलं आहे. तेथे दोन शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आईवरच अत्याचार केल्याचे समोर आले आहे. मुलांना चांगले मार्क देऊ, पहिला नंबर आणू अशे आमिष दाखवत दोन शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या आईवरच वेळोवेळी बलात्कार केला. यमुळे प्रचंड खळबळ माजली आहे. याप्रकरणी वर्गशिक्षकासह सहकारी शिक्षकांवर पोलिसात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.
मुलाला चांगले मार्क देऊ, आम्हाला खुश कर…
तुझ्या मुलाला चांगले मार्क देवून पहिला नंबर आणू, यासाठी आम्हाला खुष कर , अशी शरीर सुखाची मागणी करत वर्ग शिक्षकाने आणि त्याच्या सहकाऱ्याने एका विद्यार्थ्याच्या आईवर अनेक वेळा अत्याचार केला. मलकापूर शहरात ही भयानक घटना घडली आहे. मलकापूर येथील नूतन विद्यालयातील सहाय्यक शिक्षक समाधान इंगळे आणि सहाय्यक शिक्षक अनिल थाटे या दोन्ही आरोपी शिक्षकांनी एका 34वर्षीय पीडित महिलेला आमिष दाखवून बळजबरीने तिच्यावर 10 सप्टेंबर 2024 ते 22 एप्रिल 2025 पर्यंत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. तसेच त्या दोघांना खुश ठेवले नाही तर तिला आणि मुलाला जिवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती, असे महिलेने फिर्यादीत नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितलं.
याप्रकरणी नूतन विद्यालयाचे वर्गशिक्षक समाधान इंगळे आणि शिक्षक, अनिल थाटे यांच्यावर मलकापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे मलकापूरसह शाळा परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी त्या नराधम दोन शिक्षकांना अटकही केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
