बॅंक खात्यात चार लाख असतानाही सायबर गुन्हेगाराने सहा लाख कसे लुटले ? अजब चलाखीने तुम्ही व्हाल हैराण

क्रेडीट कार्ड देण्याच्या नावाखाली बॅंक डीटेल्स मिळवून लुबाडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशा प्रकारे पुण्यातील एका महिला इंजिनिअरला 6.7 लाखाचा गंडा घातला गेला आहे.

बॅंक खात्यात चार लाख असतानाही सायबर गुन्हेगाराने सहा लाख कसे लुटले ? अजब चलाखीने तुम्ही व्हाल हैराण
Cybercrime Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 1:11 PM

पुणे : पुण्यातील एक मल्टी नॅशनल कंपनीत काम करणाऱ्या महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या सायबर क्राईम गुन्हेगारांच्या जाळ्यात अलगद सापडली. या गुन्हेगाराने तिचे क्रेडीट कार्ड सस्पेन्ड करण्याची धमकी देत तिच्या नेट बॅंकींगमध्ये शिरकाव करीत तिचे चाळीस मिनिटात सात ट्रांझक्शन करीत तिच्या खात्यातून 6.7 लाखाची रोकड सायबर भामट्यांनी पळविल्याची घटना उघडकीस आली आहे.

पुण्याच्या एका 24 वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनियर तरूणीला 1 मे रोजी दुपारी एक वाजता अनोळखी क्रमांकावरून फोन आला. आपण बॅंकेचा एक्झुकेटीव्ह बोलतोय असे त्याने भासविले. त्या व्यक्तीने त्या तरूणीला सांगितले की तिच्या नावाने दोन क्रेडीट कार्ड जारी झाले असून एक क्रेडीट कार्ड अजून अॅक्टीवेट झालेले नाही. तुम्हाला ते क्रेडीट कार्ड अॅक्टीव करायचे आहे की सस्पेंड करायचे आहे असे विचारले. त्यानंतर तक्रारदार महिलेने ते सस्पेंड करा असे सांगितले. ते क्रेडीट कार्ड सस्पेंड करण्याच्या नावाखाली त्याने तिच्या अकाऊंटचे सर्व डीटेल्स आणि पॅनकार्ड क्रमांक अशी सर्व माहीती काढून घेतली. त्यानंतर तिला वन टाईम पासवर्ड शेअर करायला सांगितला. त्यानंतर गुन्हेगाराने तिच्या नेट बॅंकींग अकाऊंटमध्ये शिरकाव मिळविला आणि तिचा ईमेल आयडी thedarkpartoflife नावाने बदलला असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चोवीस तासांत तक्रार करणे गरजेचे

त्यानंतर काही मिनिटांत सायबर गुन्हेगाराने तिच्या नावाने दोन लाखांचे प्री अप्रुव्ह पर्सनल लोनही मंजूर केले. त्याचा मॅसेज तक्रारदार महिलेला गेल्यावर आपण फसवले गेल्याचे तिला समजले. काही करण्याआधीचे सायबर गुन्हेगाराने तिच्या खात्यातील शिल्लक रक्कम 4.7 लाख आणि 2 लाखाचे कर्जाऊ रक्कम अशी 6.7 लाखाची रक्कम काही क्षणात काढून तो मोकळा झाला. या प्रकरणाची तक्रार तिने हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी कायदा आणि भारतीय दंड विधान संहितेच्या अनेक कलमांतर्गत या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकरणात लवकरात लवकर तक्रार दाखल केली तर गुन्हेगारावर लागलीच कारवाई करून गुन्हेगारावर कारवाई करणे आणि पैसे मिळविले सोपे जाते. अशा घटनात 24 तासांच्या गोल्डन अवरमध्ये गुन्हा दाखल करणे खूप गरजेचे असते अशी माहीती सूत्रांनी दिली.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.