जयपूर : सप्टेंबर २०१३ पर्यंत आसाराम बापूला (Asaram Bapu) देश संत म्हणून ओळखत होते. प्रवचन ऐकण्यासाठी लाखो लोकं येत. महिला, बालकं तसेच युवकंही त्यात राहत. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, आसाराम बापूला हात जोडत. २०१३ मध्ये शाहजहानपूर येथील एका बालिकेने आसाराम विरोधात दिल्लीत शारीरिक शोषणाचा गुन्हा दाखल केला. घटनास्थळ जोधपूर सांगितलं होतं. तत्कालीन डीएसपी अजय पाल लंबा यांनी प्रकरणाचा तपास केला. परंतु, धर्मगुरुला अटक करणे सोपे काम नव्हते. पोलिसांसमोर हे एक आव्हान होते. आसाराम बापूची अटक चित्रपटापेक्षा काही कमी थरारक घटना नव्हती.