पती आईकडे पैशांची मागणी करत होता, पत्नी म्हणाली दारु पिता तर…, मग पतीची सटकली अन्…

आई आणि मुलामध्ये जमिनीच्या पैशावरुन वाद सुरु होता. पत्नी आपल्या पतीची समजूत काढत होती. पण पतीला हे खटकलं अन् पुढे भयंकर घडलं.

पती आईकडे पैशांची मागणी करत होता, पत्नी म्हणाली दारु पिता तर..., मग पतीची सटकली अन्...
जमिनीच्या वादातून पतीकडून पत्नीवर हल्ला
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 06, 2023 | 12:39 PM

डोंबिवली : मायलेकाच्या वादात पडण एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. सासू आणि पतीच्या वादात समजूत काढणाऱ्या पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. संतोष म्हसकर असे आरोपी पतीचे नाव आहे. संतोषला दारुचे व्यसन आहे. सुदैवाने यात पत्नीच्या जीव बचावला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आईकडे जमिनीचे पैसे मागत होता आरोपी

डोंबिवलीमधील मुक्ताई कॉलनी भोपर कमानी जवळ संतोष म्हसकर आपल्या कुटुंबासह राहतो. संतोषची त्यांच्यापासन वेगळी राहते. संतोष म्हसकर याला दारूचे व्यसन आहे. संतोषच्या आईला तिच्या माहेरुन जमिनीचा हिस्सा मिळाला होता. ही जमीन विकल्याने तिच्याकडे पैसे आले होते. जमिनीतून आलेले पैसे मला दे, असा तगादा संतोषने आपल्या आईकडे लावला होता. संतोष याला दारूचे व्यसन असल्याने त्याची आई त्याला पैसे देणं टाळत होती.

आईच्या पैशावरुन पती-पत्नीमध्ये वाद

याच मुद्द्यावरून संतोष आणि त्याची पत्नी सुहासिनी यांच्यात वाद झाला. यावेळी दारू पिता तर पैसे कशाला पाहिजे, असं सुहासिनीने त्याला म्हटलं. पत्नीच्या अशा बोलण्याचा राग आल्याने संतोषने तिला शिवीगाल करत गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. सुदैवाने पत्नी यात वाचली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत, अवघ्या काही तासात आरोपी संतोषला अटक केली आहे.