AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू लग्नात नाचलीसच का? नवरा-बायकोत जुंपली, चालत्या बाईकवरून उतरून बायकोची थेट कालव्यात उडी; नवऱ्यानेही…

उत्तर प्रदेशात एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नी लग्न सोहळ्यात नाचली म्हणून नवऱ्याचं आणि तिचं भांडण झालं. लग्नाहून परततानाही दोघांमध्ये वाद सुरूच होता. त्यामुळे पत्नीने बाईकवरून उतरून थेट कालव्यात उडी घेतली.

तू लग्नात नाचलीसच का? नवरा-बायकोत जुंपली, चालत्या बाईकवरून उतरून बायकोची थेट कालव्यात उडी; नवऱ्यानेही...
canalImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 31, 2023 | 6:44 AM
Share

हरदोई : उत्तर प्रदेशातील हरदोईच्या माधौगंज येथे अत्यंत धक्कादायक घटना घढली आहे. लग्नात नाचण्यावरून नवरा-बायकोमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यामुळे बायकोने थेट चालत्या बाईकवरून उतरून कालव्यात उडी घेतली. पत्नीला वाचवण्याच्या नादात नवऱ्यानेही कालव्यात उडी घेतली. परंतु, पाण्याचा प्रचंड वेग असल्याने दोघेही वाहून गेले. या दोघांचाही युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. मात्र, या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

काल ही घटना घडली. दोघा नवरा बायकोने कालव्यात उडी घेतल्याचं कळाल्यानंतर जीवरक्षकांनी या दोघांचाही शोध घेण्यास सुरुवात केली आहे. अजूनपर्यंत दोघांचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही. अंधार झाल्याने रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं आहे. आज सकाळी पुन्हा या दोघांचा शोध घेतला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघे नवरा बायको साडूच्या घरी लग्नाला गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. लग्नाहून परततानाही दोघांचं भांडण सुरूच होतं. दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झाल्याने संतप्त झालेल्या पत्नीने चालत्या बाईकवरून उडी घेतली. त्यानंतर धावतच तिने कालव्यात उडी घेतली. पत्नीने कालव्यात उडी घेतल्याने नवऱ्यानेही क्षणाचा विचार न करता कालव्यात उडी घेतली.

साडूच्या घरी लग्न

मानसिंह असं या व्यक्तिचं नाव आहे. तो माधौगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील नेवादा येथील रहिवासी आहे. त्याचा साडू बिलग्राम पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील अख्तियारपूर येथे राहतात. साडूच्या घरी लग्न समारंभ होता. या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याकरिता मानसिंह त्याची पत्नी आरतीसोबत आला होता.

बहिणीसोबत डान्स

लग्न सोहळ्यात आल्यानंतर आरती तिच्या बहिणींसोबत लग्नात डान्स करत होती. त्यावर मानसिंह याने आरतीला हटकले. पण तरीही आरती डान्स करत होती. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे दोघेही आपल्या घराकडे जायला निघाले होते. बाईकवरून जात असतानाही दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडत होती. दोघे शारदा कालव्याच्या पुलावर आले होते. त्यावेळी अचानक दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. गाडी पुलावर आल्याने गाडीचा वेगही कमी झाला. तिच संधी साधत संतापलेली आरती बाईकवरून उतरली आणइ तिने तडक कालव्यात उडी घेतली.

कुटुंबीयांची पुलावर धाव

कालव्यात प्रचंड पाणी होतं. आरतीने उडी घेतल्याने मानसिंहनेही कालव्यात उडी घेतली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांसोबत मानसिंह आणि आरतीच्या कुटुंबीयांनी पुलावर धाव घेतली. जीवरक्षकांच्या मदतीने या दोघांचाही शोध सुरू आहे. मात्र त्यांचा काहीच पत्ता लागलेला नाही. अप्पर पोलीस अधीक्षक दुर्गेश कुमार सिंह यांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत तपास सुरू केला आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा