पहिले अश्लील चॅट, मग व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमिलिंग; पती-पत्नीचा विचित्र कारनामा
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका पती आणि पत्नीने केलेला विचित्र प्रकार समोर आला आहे.

हैदराबादच्या अंबरपेट परिसरातील मल्लिकार्जुन नगर येथे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. आर्थिक तंगीमुळे त्रस्त असलेल्या एका जोडप्याने असा मार्ग निवडला की, ज्यामुळे पोलिसही चकित झाले. या जोडप्याने मोबाइल अॅपवर आपल्या शारीरिक संबंधांचे लाइव्ह स्ट्रीमिंग केले आणि त्यासाठी पैसे उकळले. याशिवाय, त्यांनी काही दर्शकांना ब्लॅकमेल करून अधिक पैसे मागितले.
हैदराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 41 वर्षीय नरेश आणि 37 वर्षीय पल्लवी असे या जोडप्याचे नाव आहे. त्यांनी लाइव्ह स्ट्रीमिंगसाठी प्रति 5 मिनिटांना 1,000 ते 2,000 रुपये आकारले आणि रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 500 रुपयांना विकले. या जोडप्याने “Sweety Telugu Couple 2027” या नावाने आपला अश्लील कंटेंट व्यवसाय चालवला होता. लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान ते आपला चेहरा मास्कने झाकत असत. त्यांच्या घरी छापा टाकल्यानंतर पोलिसांना हाय-डेफिनिशन कॅमेरे आणि स्टुडिओसारखी व्यवस्था आढळली.
पोलिसांनी सांगितले की, या जोडप्याला त्यांच्या दोन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींच्या शैक्षणिक आणि वैद्यकीय खर्चासाठी पैशांची गरज होती, म्हणून त्यांनी हा गैरमार्ग अवलंबला. त्यांची ऑटो रिक्षा चालवण्यापेक्षा या रॅकेटमधून मिळणारी कमाई जास्त होती. पोलिसांनी या प्रकरणाचा स्वतःहून तपास सुरू केला आणि भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम 296 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत (IT Act) गुन्हा दाखल केला आहे. या जोडप्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचा सर्व दृष्टिकोनातून तपास करत आहेत, जेणेकरून या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्ती किंवा नेटवर्कचा शोध घेता येईल.
