CCTV : गाडीत कॅश ठेवून जाताय? सावधान! सांगलीनंतर आता इचलकरंजी येथे धाडसी चोरी

| Updated on: Dec 01, 2022 | 8:39 AM

एकाच दिवशी एका प्रकारे झाली दोन ठिकाणी चोरी! पश्चिम महाराष्ट्रात गाडीतून कॅश चोरणारी टोळी सक्रिय?

CCTV : गाडीत कॅश ठेवून जाताय? सावधान! सांगलीनंतर आता इचलकरंजी येथे धाडसी चोरी
चोरीची घटना कॅमेऱ्यात कैद
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

इचलकरंजी : सांगली येथे झालेल्या चोरीप्रमाणेच आता इचलकरंजी येथेही चोरी झालीय. गाडीतील जवळपास दीड लाखापेक्षा जास्तीची रोकड चोरट्यांनी लांबवली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी एकाच प्रकारे झालेल्या दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या चोरांनी दहशत निर्माण झाली आहे. गाडीतून कॅश चोरणारी टोळी तर पश्चिम महाराष्ट्रात सक्रिय नाही ना, अशी शंकाही व्यक्त केली जाते आहे. चोरी करणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाले आहेत. सध्या पोलिसांकडून चोरांना शोध घेतला जातोय.

इचलकरंजी शहरात असणाऱ्या वारणा बँक जवळ गणपती मंदिर आहे. या मंदिराच्या जवळ मोपेड गाडीतील 1 लाख 60 हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी हातोहात लंपास केली. ही घटना भरदिवसा घडली. या चोरीची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आलीय.

इचलकरंजी शहरात मोपेड गाडीमध्ये 1 लाख 60 हजाराची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. सदरची घटना वारणा बँक शाखा इचलकरंजी शेजारील गणपती मंदिराजवळ मंगळवारी दुपारी घडली. याबाबतची वर्दी शशील पांडूरंग दुर्वे (रा. डेक्कन सुतगिरणी समोर) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली आहे.

याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रांत कार्यालय चौक परिसरात वारणा बँकेची शाखा असून बँकेशेजारी गणपती मंदिर आहे. या मंदिरालगत पार्किंगमध्ये शशील दुर्वे यांनी आपली अ‍ॅक्सेस मोपेड (क्र.एमएच 09- ईएन 8000) पार्क केली होती.

या गाडीच्या डिग्गीतून दुपारी पावणे बारा ते एकच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पिशवीमध्ये ठेवलेली 1 लाख 60 हजार रोकड चोरली. ही बाब लक्षात येताच शशील दुर्वे यांनी शिवाजीनगर पोलिसांशी संपर्क साधला. घडलेला प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.

ही चोरी पाळत ठेऊन करण्यात आली असून या चोरांनी एकाच दिवशी सांगलीतील विश्रामबाग आष्टा याठिकाणी सुद्धा गाडीतून पैसे चोरी केलेत. तसंच इचलकरंजी शहरातही त्यांनी चोरी केली आहे. हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

पाहा व्हिडीओ :

काही दिवसांपूर्वी तिथेच असणाऱ्या HDFC बँक जवळ एका महिलेच्या हातातील पैशांची पिशवी गाडीवरून हिसका मारून चोरली होती. शहरात सतत चोरीच्या प्रकारात वाढ झाली आहे. घरफोडीचे प्रकारही वाढलेत. आठवडा बाजारात खरेदी करायला आलेल्या नागरिकांचे मोबाईल चोरणं, दुकान फोडून साहित्य व पैश्याची चोरी करणं, या प्रकारांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, शहरातील सेफसिटी अंतर्गत बसवण्यात आलेले काही cctv कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे पोलिसांना तपास करण्यात अडथळा निर्माण होतोय. वाढत्या चोऱ्यांमुळे व्यापारी वर्गात व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.