AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीसांनी संपूर्ण पीकअप गाडी तपासली, अखेरच्या क्षणी पोलिसांनाच धक्का बसला, ‘पुष्पा’चा कारनामा काय?

महाराष्ट्रात अवैध मद्याची मोठी विक्री होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली जात असते.

पोलीसांनी संपूर्ण पीकअप गाडी तपासली, अखेरच्या क्षणी पोलिसांनाच धक्का बसला, 'पुष्पा'चा कारनामा काय?
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Feb 14, 2023 | 3:00 PM
Share

नाशिक : गेल्या काही महिन्यांपूर्वी पुष्पा ( Pushpa ) नावाचा चित्रपट आला होता. त्यातील अल्लू अर्जुन या अभिनेत्याने केलेली भूमिका संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली होती. त्याच पार्श्वभूमीवर अनेक प्रकारची तस्करी करणारे तस्कर पुष्पा सारखं बनायला जात आहे. मात्र, पोलीसांच्या किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department)  पथकात असे पुष्पा हाती लागत आहे. दारूची अवैध ( Illegals Liquor ) वाहतुक करणाऱ्या अशाच एका पुष्पाला कळवण येथे राज्य उत्पादन विभागाच्या एका पथकाने गजाआड केलं आहे. मात्र, यामध्ये अवैध दारू वाहतुक करण्यासाठी वापरलेले शक्कल चर्चेचा विषय ठरत आहे.

नाशिकच्या कळवण येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. अवैध मद्य वाहतुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका संशयित आरोपीने थेट पिकअप वाहनात चोरकप्पा बनवून अवैध मद्य वाहतुक करत असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्रात अवैध मद्याची मोठी विक्री होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली जात असते. संपूर्ण वाहनाची तपासणी करून झाल्यावर पथकाच्या धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.

यामध्ये थेट पीकअप वाहनाच्या पाठीमागील बाजूलाच चोरकप्पा बनविण्यात आला होता. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने पीकअप वाहनाची तपासणी करत असतांना ही बाब उघड झाली आहे.

राज्य उत्पादन विभागाच्या निरीक्षकांना गोपनीय माहितीवरुन पीकअप वाहनात अवैध वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून कळवण हद्दीतील राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू केली होती.

यामध्ये संशयित पीकअप वाहन असल्याने तपासणी केल्यानंतर आपल्याला चुकीची माहिती मिळल्यची खात्री पटली होती. मात्र, त्यानंतर मात्र पथकातील चालक असलेल्या कर्मचाऱ्यांने गाडीच्या बॉडीचा आकार थोडा मोठा असल्याचा संशय आला.

संपूर्ण पीकअप वाहन तपासले मात्र यामध्ये कुठेही काहीही आढळून आले नाही. मात्र खालील बाजूला असलेल्या बॉडीच्या मधील पत्रा ओढून बघितल्यानंतर मध्ये चोरकप्पा बनविल्याचे समोर आले आणि त्यात विविध प्रकारच्या मद्याचे बॉक्स आढळून आले.

चित्रपटाला लाजवेल अशाच स्वरूपाची अवैध तस्करी समोर आल्याने पथकालाही मोठा धक्काच बसला. जवळपास दहा लाखांच्या किंमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केला आहे.

राज्य उत्पादन शुल्काच्या कारवाई असा मद्य तस्करीचा प्रकार समोर आल्याने पीकअप वाहनांतून तस्करी होत असल्याचे समोर आले असून आता पीकअप वाहने रडारवर आहे. नुकत्याच केलेल्या कारवाईत सुरेश कुमार रामलाल बिश्नोई याला अटक केली आहे.

या कारवाईत विदेशी कंपनीच्या अवैध मद्याचा लाखों रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून असा कुठला संशय आढळून आल्यास टोल फ्री नंबरवर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड