
Delhi Murder Case: समाजात नैतिक – अनैतिकेत असे काही अंतरच उरलेले नाही. अनैतिक संबंधाचे एकामागोमाग अशी प्रकरणे उघडकीस येत आहेत ती पाहाता समाज कुठल्या स्तराला गेला आहे याचे कोडे पडावे. दिल्लीतील द्वारका परिसरातून एक भयंकर प्रकरण उघडकीस आले आहे. येथे एक लग्न झालेल्या गृहीणीने आपल्या दीराच्या मदतीने आपल्या पतीची निर्घृण हत्या केल्याचे उघडीस आले आहे. पोलिसांनी वहिनी आणि दीराच्या दरम्यान झालेली इंस्टाग्राम चॅट्स जप्त केली आहे.या चॅट्सने नातेसंबंधातील कट उघड झाला आहे.
दक्षिण-पूर्व द्वारका परिसरातील ३५ वर्षांच्या करण देव याची हत्या त्याची पत्नी सुश्मिता देव आणि भाऊ राहुल देव यांनी केल्याचे उघडकीस आले आहे. १३ जुलै रोजी संयशास्पद स्थितीत करणचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि अनेक अंगाने तपास सुरु करण्यात आला.
खुनाचा हा प्रकार असल्याचे तपास करताना उघड झाले. आपला पती करंट लागून बेशुद्ध पडल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेले आणि तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. सुश्मिता आणि राहुल आणि त्याच्या वडिलांनी पोस्टमार्टेमचा विरोध केला. ज्यामुळे कुटुंबावर संशय आला आणि पोलिस चौकशीची मागणी झाली.
करण याचा छोटा भाऊ कुणाल याला वहिनीच्या ( सुश्मिता ) मोबाईलमध्ये असे चॅट्स सापडले जे वाचून त्याला धक्का बसला. या चॅट्समुळेच सर्व बिंग फुटले. या चॅटींगमध्ये राहुल आणि सुश्मिता करणच्या हत्येचा कट कसा रचत होते ते उघड झाले. चॅटींगमध्ये राहुल सुश्मिता हीला करणला विष देण्याचा आणि इलेक्ट्रीक शॉक देण्याचा सल्ला देत होता.
सुश्मिता: बघ औषध देऊन मरायला किती वेळ लागत आहे.तीन तास झालेत, न उल्टी होत आहे. न पॉटी, काहीच नाही.मेला देखील नाही
राहुल: जर काही समजत नसेल तर करंट दे..
सुष्मिता: कसं बांधू त्याला करंट देण्यासाठी ?
राहुल: टेपने बांध…
सुष्मिता: श्वास खूप हळू चालू आहे.
राहुल: जेवढे औषध आहे तेवढे सगळे देऊन टाक
सुष्मिता: तोंड नाही उघडत आहे, पाणी टाकू शकते, पण औषध देऊ शकत नाही. तुच ये आता, मिळून काही तरी प्रयत्न करुयात.
पोलिसांनी दोघांना अटक केली
पोलिसांनी हा इंस्टाग्राम चॅटसमोर आल्यानंतर सुश्मिता आणि राहुल यांना अटक केली आहे. त्यांची चौकशी चालू आहे, तसेच आणखीन पुरावे गोळा केले जात आहेत.