असह्य वेदना दिल्या, धारदार वस्तूने हातावर गोंदवले; तिची काय चूक होती की एवढा वेदनादायी शेवट व्हावा !

महिलांवरील अत्याचाराबाबत कितीही कडक कायदे केले तरी अशा घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. अशीच एक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. घटना ऐकून तुम्हालाही संताप अनावर होईल.

असह्य वेदना दिल्या, धारदार वस्तूने हातावर गोंदवले; तिची काय चूक होती की  एवढा वेदनादायी शेवट व्हावा !
हुंड्यासाठी विवाहितेचा पतीकडून छळImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 6:17 PM

बहादूरगढ : हरियाणात एक मानवतेला काळिमा फासणारी एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. पतीने पत्नीला असह्य वेदना देत तिची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. हुंड्यासाठी पतीने पत्नीचा अमानुष छळ करत तिला संपवले. हत्या केल्यानंतर मृतदेह काही तास घरातच ठेवला. यानंतर तो मृतदेह घरात टाकून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. बीर सिंह असे आरोपी पतीचे नाव आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हुंड्यासाठी पत्नीचा छळ करायचा

बीर सिंह दिल्लीत कॅटरिंगचे काम करायचा. मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेला बीर सिंह याचा उत्तर प्रदेशातीलच रहिवासी असलेल्या तरुणीशी दोन वर्षापूर्वी दिल्लीत विवाह झाला होता. लग्नानंतर बीर सिंह पत्नीला हुंड्यासाठी त्रास देत होता. तो वारंवार पत्नीला माहेरुन हुंडा आणण्यास सांगत होता. मात्र पत्नी हुंडा आणत नसल्याने तो तिला छळत होता.

बीर सिंह नेहमी पत्नीला मारहाणही करायचा. यामुळे तिच्या माहेरचे अनेक वेळा तिला माहेरी घेऊन गेले होते. मात्र तो तिला परत घेऊन यायचा. महिलेच्या घरच्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती की बीर सिंह तिच्यासोबत असे सैतानी कृत्य करेल. बीरने पत्नीला आधी छतावरुन खाली फेकले. मग तिला बेदम मारहाण केली. तो एवढ्यावर थांबला नाही धारदार वस्तूने तिच्या हातावर आपले नाव गोंदले. यात पत्नीचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

हत्या करुन फरार झाला

पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेह घरातच ठेवला. मात्र नंतर आपण फसू हे लक्षात येताच तेथून फरार झाला. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरुन पुरावेही गोळा केले आहेत. पोलीस फरार पतीचा शोध घेत आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.