AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नीचा काळा रंग पसंत नव्हता, मग पतीने जे केले ते भयानक !

पत्नीचा काळा रंग पसंत नसल्याने पतीने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकातील केल्लूरमध्ये घडली आहे. हत्येनंतर महिलेचा पती फरार झाला आहे.

पत्नीचा काळा रंग पसंत नव्हता, मग पतीने जे केले ते भयानक !
काळा रंग पसंत नव्हता म्हणून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 03, 2023 | 6:58 PM
Share

बुर्गी : पत्नीचा काळा रंग पसंत नसल्याने पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना कर्नाटकातील जेवरगी तालुक्यातील केल्लूर गावात घडली आहे. फरजाना बेगम असे मयत महिलेचे नाव आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पती आपल्या कुटुंबासह फरार झाला आहे. या जोडप्याला 4 वर्षाचा आणि 2 वर्षाचा अशी दोन मुले आहेत. खाजा पटेल असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी जेवरगी पोलीस ठाण्यात खाजा पटेलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सात वर्षापूर्वी झाला होता विवाह

फरजाना बेगम आणि खाजा पटेल यांचा सात वर्षापूर्वी विवाह झाला होता. फरजाना रंगाने काळी-सावळी असल्याने खाजाला पसंत नव्हती. तो दररोज तिच्या रंगावरुन तिला टोमणे मारत छळ करायचा. तसेच हुंड्यासाठी ते तिचा छळ करत होते. फरजानाने याबाबत आपल्या कुटुंबीयांनाही सांगितले होते.

दूधवाल्याने माहिती दिल्यानंतर घटना उघडकीस

केल्लूरमधील एका दूधवाल्याने फरजानाचा चुलत भाऊ खुर्शीद याला फोन करुन त्याच्या बहिणीची हत्या झाल्याचे सांगितले. यानंतर खुर्शीद फरजानाच्या आई-वडिलांना घेऊन तिच्या घरी पोहचला. घरात फरजाना मृतदेह पडला होता, तर दोन्ही मुलं मृतदेहाच्या शेजारी बसली होती. तर खाजा आणि त्याचे कुटुंबीय फरार होते.

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

फरजानाच्या घरच्यांनी जेवरगी पोलीस ठाण्यात खाजाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी हुंडा आणि हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेत आहेत. शवविच्छेदनानंतर फरजानाचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. फरजानाची दोन्ही सध्या तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात आहेत.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?