वरमाला घालताच नवरदेव खाली कोसळला, तो पुन्हा उठलाच नाही; काय घडले नेमके?

डीजेच्या आवाजामुळे अस्वस्थ वाटू लागल्याने मंडपातच नवरदेव बेशुद्ध होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना बिहारमधील सीतमढी येथे घडली आहे. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

वरमाला घालताच नवरदेव खाली कोसळला, तो पुन्हा उठलाच नाही; काय घडले नेमके?
मॅट्रीमोनियल साईटवर तरुणीची फसवणूकImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 5:42 PM

सीतामढी : लग्नात डीजे आवाजाने अस्वस्थ वाटून नवरदेवाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बिहारमधील सीतामढी येथे उघडकीस आली आहे. सुरेंद्र कुमार असे मयत नवरदेवाचे नाव आहे. वरमाला घातल्यानंतर फोटोशूट सुरु असतानाच नवरदेवाला अस्वस्थ वाटू लागले. यानंतर तो जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

फोटोसेशन सुरु असताना अस्वस्थ वाटू लागले

इंदरवा गावात राहणाऱ्या तरुणीचा धनहा पंचायतीतील मनिथर येथील तरुणासोबत विवाह होणार होता. नवरदेव वरात घेऊन वधूकडे आला. वरातीचे स्वागत केल्यानंतर नवरा-नवरी स्टेटजवर आले. यानंतर नवरीने नवऱ्याची आरती करत एकेमकांना वरमाला घातली. यानंतर फोटोसेशन सुरु झाले. यादरम्यान जोरजोरात डीजे सुरु होता.

काही वेळात तो बेशुद्ध झाला

डीजे आवाजामुळे नवरदेवाला अस्वस्थ वाटत होते. तो वारंवार ते बंद करण्यासाठी सांगत होता. आवाजामुळे त्याला अधिक अस्वस्थ वाटू लागले आणि काही वेळात तो बेशुद्ध झाला. लोकांनी त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र तो काहीच प्रतिसाद देत नसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून सीतामढी येथे रेफर केले. मात्र रुग्णालयात पोहचण्याआधीच सुरेंद्रचा मृत्यू झाला. यानंतर दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.