AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी विमा काढला, मग जे केले त्याने रक्ताच्या नात्यालाच काळिमा फासला !

पैशासाठी माणूस कोणत्या थराला जाईल हे सांगणे कठिण आहे. पैशासाठी माणसाला नात्यांचाही विसर पडतो. अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

आधी विमा काढला, मग जे केले त्याने रक्ताच्या नात्यालाच काळिमा फासला !
अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीचा पतीने काढला काटाImage Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 28, 2023 | 10:06 PM
Share

दमोह : मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विम्याच्या पैशासाठी भावानेच भावाचा काटा काढल्याची घटना उघडकीस आली आहे. भावाची हत्या केल्यानंतर तांत्रिकाचे नाव पुढे करत पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याची पोलखोल केलीच. पोलिसांनी आरोपींविरुद्ध अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सुरेंद्र असे मयत व्यक्तीचे नाव आहे, तर विरेंद्र असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी वीरेंद्रच्या साथीदारालाही अटक केली आहे. तसेच हत्येत वापरलेले शस्त्रही जप्त केले आहे.

दमोह जिल्ह्यातील बटियागड पोलीस ठाण्यांतर्गत दमोह छतरपूर मुख्य रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची माहिती मिळताच बटियागड पोलिसांनी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलीस तपासात मृताचे नाव सुरेंद्र असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.

पैशासाठी भावानेच खेळला खूनी खेळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सुरेंद्रचा भाऊ वीरेंद्र याने 8 महिन्यांपूर्वी त्याचा भाऊ आणि वहिनीचा विमा काढला होता. भावाला काही झाल्यास विमा कंपनीकडून साडेचार लाख रुपये मिळाले असते. या पैशाच्या लोभापोटी वीरेंद्रने भावाच्या हत्येचा कट रचला. ही हत्या करण्यासाठी त्याने मित्राची मदत घेतली. त्यानंतर वीरेंद्रने संधी साधत सुरेंद्रवर देशी कट्ट्याने गोळी झाडली. गोळी लागताच सुरेंद्र जागीच कोसळला. यानंतर मृतदेह जंगलात टाकून दोन्ही आरोपी पळून गेले.

वीरेंद्रनेच आपल्या भावाचा मृतदेह जंगलात असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. एका तांत्रिकाने आपल्या भावाचा मृतदेह जंगलात कुठे पडला आहे हे सांगितल्याचे त्याने पोलीस जबाबात सांगितले. अंत्यसंस्कारानंतर पोलिसांनी वीरेंद्रची चौकशी केली. या चौकशीत आधी वीरेंद्रने पोलिसांची दिशाभूल केली. पण पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?