पत्नीसोबतचा संवाद त्याला नकोसा होता, वारंवार तेच होत राहल्याने त्याने काढला काटा, आता…

एका तरुणाचे एका विवाहित महिलेशी फोनवर बोलणे होत होते. ही बाब महिलेच्या पतीला मान्य नव्हती. त्याने दोघांनाही समजावले आणि एकमेकांशी संपर्क न ठेवण्यास बजावले. मात्र दोघेही ऐकत नव्हते.

पत्नीसोबतचा संवाद त्याला नकोसा होता, वारंवार तेच होत राहल्याने त्याने काढला काटा, आता...
एनसीबी अधिकारी असल्याचे सांगत महिला डॉक्टरची फसवणूक
Image Credit source: Google
| Updated on: Mar 20, 2023 | 7:27 PM

आगर मालवा : पत्नीसोबत बोलतो म्हणून पतीने एका तरुणाला भयंकर शिक्षा दिल्याची घटना मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यात घडली आहे. पतीने 21 वर्षीय तरुणाचा प्रायव्हेट पार्टच कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाच्या भावाच्या फिर्यादीवरुन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 326, 323, 294, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत.

तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु

जखमी तरुणाला उज्जैन जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुसनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय सगरिया यांनी सांगितले की, जखमी तरुण हा स्वतः विवाहित असून, तो आरोपीच्या पत्नीशी फोनवर बोलत असे. दोघेही सतत फोनवर संपर्कात होते. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी महिलेच्या पतीने दोघांना बोलताना पकडले. यानंतर त्याने पत्नी आणि पीडित तरुणाला समजावून सांगितले.

तरुण एकटा असताना आरोपीने केला हल्ला

मात्र, यानंतर आरोपीच्या मनात तरुणाविषयी द्वेष भावना निर्माण झाली. अनेक दिवसांपासून तो तरुणावर हल्ला करण्याचा कट रचत होता. अखेर 19 मार्च रोजी त्याला पीडित तरुणावर हल्ला करण्याची संधी मिळाली. 19 मार्च रोजी रात्री उशिरा तो एकटाच शेतात जात असताना आरोपीने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा प्रायव्हेट पार्टच कापला. हल्ल्यानंतर काही वेळातच तो बेशुद्ध झाला आणि रात्रभर तिथेच पडून राहिला.

सकाळी तरुणाचा भाऊ शेतात आल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर तरुणाने भावासह पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.