अ‍ॅप डाऊनलोड करताच लाखो रुपये गायब, सायबर गुन्हेगारीचा नवा फंडा

सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीसाठी आता अॅपला आपले माध्यम बनवले आहे. अॅप डाऊनलोड होताच खात्यातील पैसे सायबर गुन्हेगार चोरतात. अशीच एक घटना मुंबईतील अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे.

अ‍ॅप डाऊनलोड करताच लाखो रुपये गायब, सायबर गुन्हेगारीचा नवा फंडा
अंधेरीतील महिलेला सात लाखाला गंडाImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 5:19 PM

मुंबई : फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवे फंडे अंमलात आणत आहेत. ऑनलाईन फसवणुकीनंतर आता अॅपच्या माध्यमातून फसवणूक करण्याचे नवे फंडे गुन्हेगारांनी अवलंबले आहेत. मुंबईतील अंधेरी येथे राहणाऱ्या 65 वर्षीय मानसी मुळे या अशाच अॅपच्या फसवणुकीची बळी ठरल्या आहेत. सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या खात्यातून तब्बल 6,91,859 रुपये चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. मानसी यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसी कलम 420 (फसवणूक), माहिती कायदा कलम 66(सी) आणि 66(डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

आधी महिलेच्या पतीच्या मोबाईलवर मॅसेज आला

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, 20 मार्च रोजी सकाळी 11:30 च्या सुमारास तिच्या पतीच्या मोबाईलवर एक मेसेज आला. या मॅसेजमध्ये मागील महिन्याचे वीज बिल जमा केले नाही, असे लिहिले होते. जर बिल भरले नाही तर त्याचे वीज कनेक्शन तोडले जाईल. काही अडचण आल्यास संपर्क करण्यासाठी या मेसेजसोबत एक नंबरही देण्यात आला होता.

फोन केल्यानंतर अॅप डाऊनलोकड करण्यास सांगितले

मेसेज वाचताच तिने त्या नंबरवर कॉल केला. फोनवर समोरच्या व्यक्तीने अदानी इलेक्ट्रिसिटी ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगितले. गेल्या महिन्याचे बिल भरले नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर मानसी यांनी बिल भरल्याचे सांगितले. यानंतर समोरच्या व्यक्तीने बिल ऑनलाइन दिसत नसल्याचे सांगितले. तसेच “टीम व्ह्यूअर क्विक सपोर्ट” अॅप डाउनलोड करण्यास सांगितले.

हे सुद्धा वाचा

मानसी यांनी अॅप डाउनलोड केले. अॅपवर त्यांची जुनी बिले दिसू लागली. त्यानंतर काही वेळाने मानसी यांच्या मोबाईलवर तीन वेगवेगळे मेसेज आले. या मॅसेजमध्ये खात्यातून पैसे काढले गेल्याचे लिहिले होते. त्या खात्यातून तीन वेळा एकूण 6 लाख 91 हजार 859 रुपये डेबिट झाले होते.

बँकेतून फोन आल्यानंतर घटना उघडकीस

पैसे काढल्यानंतर मानसी मुळे यांना एसबीआय फ्रॉड मॅनेजमेंटचा फोन आला. बँकेकडून त्यांना खात्यातून पैशाचा व्यवहार केले का अशी विचारणा त्याला करण्यात आली. त्यांनी नकार दिला. नंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर मानसी यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल केला.

895847

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.