किरकोळ कारणातून पत्नीला संपवले, मग अपघाताचा बनाव केला; पण…

शिवाजीनगर परिसरात सातीअसरा वीटभट्टीजवळ मीरा पिनू पवार आणि पिनू सोमनाथ पवार हे दाम्पत्य राहत होते. मोलमजुरी करुन दोघे आपला उदरनिर्वाह चालवत होते. पती-पत्नीला दोघांनाही दारुचे व्यसन होते. यामुळे दररोज दारु पिऊन दोघे भांडण करायचे.

किरकोळ कारणातून पत्नीला संपवले, मग अपघाताचा बनाव केला; पण...
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 10:42 AM

नाशिक / चैतन्य गायकवाड (प्रतिनिधी) : घरगुती वादातून मद्यपी पतीने लाकडी दांडका डोक्यात घालून पत्नीची हत्या केल्याची घटना नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजीनगर भागात घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर घरामध्येच ती पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. मात्र शवविच्छेदन अहवालात डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता सदर हत्या उघडकीस आली. यानंतर पोलिसांनी आरोपी अटक केली आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत. मीरा पिनू पवार असे मयत 40 वर्षीय महिलेचे नाव आहे.

पती-पत्नीमध्ये दारु पिऊन रोज भांडण व्हायचे

शिवाजीनगर परिसरात सातीअसरा वीटभट्टीजवळ मीरा पिनू पवार आणि पिनू सोमनाथ पवार हे दाम्पत्य राहत होते. मोलमजुरी करुन दोघे आपला उदरनिर्वाह चालवत होते. पती-पत्नीला दोघांनाही दारुचे व्यसन होते. यामुळे दररोज दारु पिऊन दोघे भांडण करायचे. मंगळवारीही दोघांमध्ये नेहमीप्रमाणे भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की पिनूने मीराला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरवात केली.

मारहाणीत डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पत्नीचा मृत्यू

लाकडी दांडक्याने मारहाण करत मीराच्या डोक्यावर वार केला. यात मीराला गंभीर दुखापत झाली. यानंतर तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी घरात चक्कर येऊन पडल्याने पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचा आरोपीने बनाव केला. यानंतर उपचारादरम्यान मीराचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात मीराचे शवविच्छेदन करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत अटक

शवविच्छेदन करताना मीराच्या अंगावर आणि डोक्यावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी सुरु केली असता आरोपीने सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.