Nashik: डॉक्टर नववधूच्या Virginity Testचा अघोरी प्रकार टळला; पोलिसांचा दट्ट्या ठरला प्रभावी

| Updated on: Nov 22, 2021 | 11:08 AM

पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी हॉटेल मालकाला नोटीस बजावली.लग्नस्थळी दाखल होत जातपंचाय सदस्यांनाही फैलावर घेतले. असे अघोरी प्रकार केल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा दिला.

Nashik: डॉक्टर नववधूच्या Virginity Testचा अघोरी प्रकार टळला; पोलिसांचा दट्ट्या ठरला प्रभावी
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः अखेर नाशिकमध्ये होणारी डॉक्टर नववधूची अघोरी कौमार्य चाचणी टळली आहे. जातपंचायतीविरोधात केलेली तक्रार आणि पोलिसांच्या कारवाईच्या दट्ट्याने साऱ्यांचे धाबे दणाणले. त्यामुळे हा प्रकार टळला. विशेष म्हणजे मुलीचा नवरा हा मर्चंट नेव्हीमध्ये. सारे सुशिक्षित कुटूंब. मात्र, तरीही नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील एका हॉटेलमध्ये रविवारी लग्न झाल्यानंतर हा प्रकार होणार होता. याची तक्रार अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे आली होती. अनिंसच्या कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता.

पोलिसांची हॉटेल मालकाला नोटीस

अंनिसच्या तक्रार अर्जाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी हॉटेल मालकाला नोटीस बजावली. काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार धरण्यात येईल, असा इशा दिला. सोबतच लग्नस्थळी दाखल होत त्यांनी जातपंचाय सदस्यांनाही फैलावर घेतले. असे अघोरी प्रकार केल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा दिला. त्यानंतर जातपंचायतही नरमल्याचे समजते. असे प्रकार घडल्यास अंधश्रद्धा निर्मुलन समिती किंवा पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

अनेकांनी आत्महत्या केल्या

कौमार्य चाचणीची कुप्रथा एका समाजात आहे. लग्नानंतर यात फक्त वधूची कौमार्य याचणी घेतली जाते. यात जातपंचायत आपण दिलेल्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रांवर वर आणि वधूंना झोपायला सांगते. या कपड्यांवर रक्ताचा डाग पडला, तरच ते लग्न ग्राह्य धरले जाते. अन्यथा लग्न अमान्य केले जाते. वधूला मारहाण होते. पालकांना शिक्षा केली जाते. त्यांच्याकडून खूप मोठा आर्थिक दंड वसूल केला जातो. कुटुंबाला वाळीतही टाकले जाते. यावरून अनेकांनी आत्महत्याही केल्या आहेत.

अंनिसकडून कारवाईचे स्वागत

दरम्यान, अंनिस आणि जातपंचायत मूठमाती अभियानानेच राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. विशेष मुलींनी याबाबत पुढे यावे. आवर्जुन तक्रार द्यावी. बदनामीच्या भीतीने मौन बाळगू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नवरा मुलगा हा स्वतः सुशिक्षित असतो. त्यानेच असे प्रकार घडू नयेत म्हणून पुढाकार घ्यावा. आपल्या कुटुंबाची समजूत काढावी. त्यानंतर असे प्रकार घडणारच नाहीत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

इतर बातम्याः

Nashik| मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एका कैद्याची आत्महत्या; झाडाला चादर बांधून घेतला गळफास

आरोग्य भरतीमध्ये फेरपरीक्षा, चुकीची प्रश्नपत्रिका मिळालेल्या 572 उमेदवारांची यादी जाहीर