IND vs NZ : अभिषेकनंतर रिंकूचा तडाखा, 14 षटकार-238 धावा, टीम इंडियाचा धमाका, स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक
India vs New Zealand 1st T20i : टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध 238 धावा केल्या. भारताने यासह कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आपलाच रेकॉर्ड ब्रेक केला. जाणून घ्या भारताने काय केलं?

टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20i मालिकेतील पहिल्या सामन्यात धमाका केला आहे. न्यूझीलंडने भारताला नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताने या संधीचा पूर्णपणे फायदा घेत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याचा निर्णय चुकीचा ठरवत पाहुण्या संघासमोर मोठं लक्ष्य ठेवलं. भारताने या सामन्यात आपलाच रेकॉर्ड ब्रेक केला. भारताने न्यूझीलंड विरुद्ध टी 20i मधील सर्वोच्च धावसंख्या उभारली. भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 238 धावा केल्या. भारताला इथवर पोहचवण्यात अभिषेक शर्मा आणि रिंकु सिंह या दोघांनी प्रमुख योगदान दिलं.
अभिषेक आणि रिंकूचा तडाखा
अभिषेक शर्मा याने या सामन्यात भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. अभिषेकला शतक करण्याची संधी होती. मात्र अभिषेकची संधी अवघ्या 16 धावांनी हुकली. अभिषेकने 35 बॉलमध्ये 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 84 धावा केल्या.
अभिषेकनंतर अखेरच्या काही ओव्हरमध्ये आपल्या फिनिशर या भूमिकेला न्याय देत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. रिंकुने शेवटच्या काही षटकात टॉप गिअरमध्ये बॅटिंग केली. रिंकूने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला 20 व्या ओव्हरमध्ये 21 धावा करता आल्या. रिंकूचं 21 धावांत 20 धावांच योगदान राहिलं. रिंकूने 20 बॉलमध्ये 220 च्या स्ट्राईक रेटने 3 सिक्स आणि 4 फोरसह नाबाद 44 धावा केल्या.
सूर्या आणि हार्दिकचं निर्णायक योगदान
अभिषेक आणि रिंकु व्यतिरिक्त कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या या दोघांनीही भारताला 238 धावांपर्यंत पोहचवण्यात योगदान दिलं. सूर्याने 32 तर हार्दिकने 25 धावा केल्या. तर संजू सॅमसन याने 10 धावा जोडल्या. त्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
न्यूझीलंड विरुद्ध आपलाच रेकॉर्ड ब्रेक
टीम इंडियाने 238 धावांच्या खेळीसह न्यूझीलंड विरुद्ध आपलाच विक्रम मोडीत काढला आहे. भारताची न्यूझीलंड विरुद्धची टी 20i क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. भारताने याआधी न्यूझीलंड विरुद्ध 2023 साली अहमदाबादमध्ये 4 विकेट्स गमावून 234 धावा केल्या होत्या.
भारत तिसराच संघ
दरम्यान टीम इंडियाने नागपुरातील या 238 धावांसह खास कामगिरी केली. न्यूझीलंड विरुद्ध भारत सर्वोच्च धावसंख्या करणारा तिसराच संघ ठरला. न्यूझीलंड विरुद्ध टी 20i मध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड विरुद्ध 2018 साली ऑकलँडमध्ये 245 धावा केल्या होत्या. तर इंग्लंडने नेपियरमध्ये 2019 साली 241 धावांपर्यंत मजल मारली होती.
