Nashik: नाशिकमध्ये देवासह पुजेचं साहित्य चोरीला, देवारा केला मोकळा, मग पोलिसांनी…
चोरट्याने मारला देवाऱ्यावर डल्ला, चांदीचा देव पुजेचं साहित्य चोरीला, संपुर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरवा आहे. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर...

नाशिकमध्ये देवासह पुजेचं साहित्य चोरीलाImage Credit source: tv9marathi
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) दोन संशयित चोरट्यांना पोलिसांनी (Bhardakali Police)ताब्यात घेतलं आणि चौकशी केली असता. त्यांच्याकडे विविध वस्तु आढळून आल्या. विशेष म्हणजे चोरट्यांनी चोरी करीत असताना घरात असलेले चांदीचे देव (God of Silver) आणि पुजेचं साहित्य सुध्दा चोरले आहे. त्यामुळं संपुर्ण दोन चोरांची अधिक चर्चा आहे. भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी झाल्याची तक्रार दाखल झाली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर 55 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दोघांची चौकशी सुरु असून आणखी गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
नेमकं काय झालं
नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्या करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान दोघांच्याकडे 55 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल सापडला तो पोलिसांनी जप्त केला. तक्रारदार यांच्या घरातील देव्हाऱ्यातील चांदीचे घडवण असलेले देव आणि पूजेचे पितळी साहित्य चोरीला गेले होते. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भद्रकाली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी संशयित आरोपी आणि त्याला मदत करणारा त्याचा मित्र यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच चांदीचे घडवण असलेले देव आणि पूजेचे पितळी साहित्य तसेच दुसऱ्या गुन्ह्यातील चोरीस गेलेली सोन्याची चेन असा एकूण 55 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन संशयितांकडून दोन गुन्हे उघडकीस आले असून, पोलीस आणखी तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी दिली
