पत्नीला प्रियकरासोबत पाहिल्यावर पतीला संताप अनावर, मग जे केले ते ऐकून अंगावर काटा येईल !

सीमाचे किशनसोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यासोबत प्रेमसंबंध होते. याला किशनचा विरोध होता. किशनने विरोध केल्यास सीमा त्याला सोडून प्रियकरासोबत रहायला जाण्याची धमकी द्यायची.

पत्नीला प्रियकरासोबत पाहिल्यावर पतीला संताप अनावर, मग जे केले ते ऐकून अंगावर काटा येईल !
पैशाच्या वादातून अल्पवयीन मुलाला मित्रांनी संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 25, 2023 | 6:40 PM

गाझियाबाद : पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे घडली आहे. पतीने डोक्यात हातोड्याने वार केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. महिलेच्या भावाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करत आरोपीला अटक केली आहे. किशन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.

गाझियाबादमधील विजयनगर सेक्टर 9 मध्ये आरोपी किशन आपली पत्नी सीमा आणि तीन मुलांसह राहत होता. किशन टाईल्स लावण्याचे काम करतो, तर त्याची पत्नी नोएडातील एका कंपनीत काम करत होती.

पत्नीचे पतीच्याच सहकाऱ्याशी होते प्रेमसंबंध

सीमाचे किशनसोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यासोबत प्रेमसंबंध होते. याला किशनचा विरोध होता. किशनने विरोध केल्यास सीमा त्याला सोडून प्रियकरासोबत रहायला जाण्याची धमकी द्यायची.

वाद विकोपाला गेल्याने पतीने हातोड्याने पत्नीवर वार केला

नेहमीप्रमाणे काल रात्री प्रेमसंबंधांवरुन पती-पत्नीमध्ये वाद झाला. यानंतर सीमा मुलांसह आपल्या प्रियकराकडे निघून जाण्याची धमकी देऊ लागले. यामुळे किशन संताप अनावर झाला आणि त्याने घरातील हातोडा घेऊन सीमाच्या डोक्यात वार केला.

जखमी पत्नीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी सीमाला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पत्नीच्या आरोपाखाली किशनला पोलिसांनी अटक केली आहे.

Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.